फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबरचा महिना सण उत्सवांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात मोठे व्रत वैकल्य येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तसेच हरतालिका, गणेश चतुर्थी आणि पद्मा एकादशी या महिन्यात आहे. या महिन्याच्या शेवटी पितृपक्षाची सुरुवात होईल. या व्रत वैकल्यांना हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी जाणून घ्या
दरवर्षी अष्टमी तिथीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. यावेळी ही भीती शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी येत आहे. त्या दिवशी भगवान कृष्णांने द्वारपार युगात आई देवकी आणि वडील नंदन यांच्या घरात जन्म झाला.
श्रावण महिन्याच्या अमावस्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. या दिवशी पूर्वजांच्या पूजेसाठी कुशा गवत गोळा केले जाते आणि वर्षभर त्याचा पूजेत उपयोग केला जातो. या अमावस्येला कुशाग्रहणी अमावस्या देखील म्हटले जाते. यावेळी ही अमावस्या १० सप्टेंबर रोजी आहे.
भाद्रपद महिन्याच्या तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत पाळले जाते. यावेळी हे व्रत १४ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. महिला या दिवशी निर्जळी उपवास करतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची विधिपूर्वक पूजा करतात.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हा सण पूर्ण १० दिवस असतो. यावेळी गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत विधिपूर्वक पूजा केली जाते.
महालक्ष्मी व्रत भाद्रपद महिन्यात पाळले जाते. असे मानले जाते की, देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. त्यासोबतच रखडलेली कामे पूर्ण होतात. महालक्ष्मी व्रत यावेळी १८ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे आणि ते पूर्ण १६ दिवस असते.
या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे.
अनंत चतुर्थीला गणेशोत्सवाची सांगता होते. यावेळी अनंत चतुर्थी २५ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी भक्त बाप्पाची विधिपूर्वक पूजा करून विसर्जन करतात. गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना केल्यावर दीड, पाच, सात किंवा ११ दिवसांनी विसर्जन करतात.
ृभाद्रपद महिन्यातील कृष्ण पौर्णिमा तिथीला प्रष्ठोपदी पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी पितरांची पूजा, श्राद्ध, तर्पण इत्यादी कार्य केले जाते. असे केल्यानेपितरांचे आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे. यावर्षी भाद्रपद पौर्णिमा शनिवार, २६ सप्टेंबर रोजी येत आहे.
यावेळी पितृपक्षाची सुरुवात रविवार, २७ सप्टेंबरपासून होत आहे. यावेळी पितृ कुटुंबाच्या जवळ येतात. अशा वेळी त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण इत्यादी विधी केल्याने कुटुंबावर पितरांचा आशीर्वाद राहतो, अशी श्रद्धा आहे. सोबतच सुख शांती नांदते.
भरणी श्राद्ध हे पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र असताना चतुर्थी किंवा पंचमी तिथीवर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाणारे एक विशेष धार्मिक विधी आणि श्राद्ध आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






