फोटो सौजन्य- फेसबुक
आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या फार महत्त्वाचा समजला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना तसेच त्यांच्या समवयस्क मित्रांचो औक्षण करावे अशी प्रथा आहे. त्यामागील हेतू कोणता ते जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- श्रावणात तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे? ते जाणून घ्या
यंदा रविवार, 4 ऑगस्ट रोजी दीप अमावस्या आहे. यादिवशी आपण घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करालच, त्यासोबतच घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरु नका.
भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातींना, ज्योतीला फार महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राण शक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे म्हणून मुलांनाही वंशाचा दिवा म्हटले जाते.
हेदेखील वाचा- घरामध्ये बेलपत्राचे रोप लावणे शुभ की अशुभ, जाणून घ्या वास्तू नियम
लहान मुलांना का ओवाळावे
प्रकाश अंधःकार दूर करुन सारे काही उजळून टाकते असं मानलं जाते. त्याचप्रमाणे संकट दूर करुन मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते.
आजचे मूल हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत, यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा संबंध कृष्ण कथेत आहे.
यमुनेच्या तीरावर दररोज गाई गुरे मृत्युमुखी पडत होती. तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले. त्याने यमुनेत उडी टाकून कालियामर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करुन बासरी वादन करत गोकुळवासीयांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिंनी गोपाळकृष्णाची दीव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रखा सुरु आहे.