Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Good Friday’ दिवस म्हणजे प्रभू येशूच्या बलिदानाचा दिवस! पण या दिवसाला ‘Good’ का म्हंटले जाते? जाणून घ्या

गुड फ्रायडे हा दिवस प्रभु येशूच्या बलिदानाची आठवण करून देतो, ज्यांनी मानवजातीच्या पापांसाठी आपला जीव दिला. या बलिदानामुळेच आपण देवाच्या कृपेचा अनुभव घेऊ शकतो, म्हणूनच हा दिवस 'गुड' मानला जातो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 17, 2025 | 06:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ख्रिश्चन धर्मामध्ये Good Friday या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. मुळात, ते क्रूसवर अत्यंत वेदनादायक पद्धतीने आसमंती विलीन झाले. तरीदेखील, ख्रिश्चन धर्मामध्ये हा दिवस शुभ किंवा गुड मानला जातो. त्यामागे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या बलिदानामागील हेतू हे कारण आहे. मानवजातीच्या उद्धारासाठी आणि पापांपासून मुक्तीसाठी प्रभूंनी आपल्या जीवाची आहुती दिली, त्यामुळे या दिवसाला शुभ मानले जाते.

Good Friday 2025: गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो? काय आहे त्यामागील धार्मिक महत्त्व

गुड फ्रायडे हे नाव कुठून आले याबाबत मतभेद आहेत. काही जण म्हणतात की ‘गुड’ हा शब्द ‘गॉड्स फ्रायडे’ मधून विकसित झाला, तर काही जण त्याचा अर्थ धार्मिक दृष्टिकोनातून घेतात. कारण या दिवशी देवाचा उद्धाराचा कार्य संपूर्ण झाले. जरी येशूचे शिष्य, परिवार व अनुयायी त्यावेळी हे समजू शकले नाहीत, तरी तीन दिवसांनंतर जेव्हा येशू पुनरुत्थित झाले, तेव्हा त्यांना या दिवशीचे खरे महत्त्व समजले की मृत्यूवर आणि पापावर विजय मिळवला गेला.

या दिवशी घडलेल्या घटनांमध्ये येशूचा शिष्य ज्यूदास याने त्यांना पकडण्यासाठी शत्रूंना ठिकाण सांगितले. त्यानंतर येशूला पकडून सानहेद्रीन या ज्यू गटासमोर न्यायासाठी उभं केलं. खोट्या आरोपांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि रोमन गव्हर्नर पिलात याच्याकडे मृत्युदंडासाठी नेण्यात आलं. पिलातने दोष नसतानाही जनतेच्या दडपणामुळे त्यांना क्रूसावर चढवण्याची आज्ञा दिली.

प्रभू येशूंना काट्यांचा मुकुट घालण्यात आला आणि क्रूस उचलून नेण्यास भाग पाडले गेले. शेवटी, त्यांना मध्यभागी क्रूस वर खिळवण्यात आलं. सहा तासांच्या यातनांनंतर येशूने “हे पिता, माझा आत्मा तुझ्या हाती देतो,” असं म्हणून प्राण सोडले. त्याच वेळी अंधार पसरला, मंदिराचा पडदा फाटला, आणि पृथ्वी हादरली.

Akshay Tritiya:अक्षय्य तृतीयेला तुमच्या मूलांकांनुसार करा वस्तूंची खरेदी, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

या दिवशी अवघा मानवजण आपले पाप, आपली मर्यादा आणि येशूने आपल्यासाठी दिलेलं बलिदान याची जाणीव ठेवतो. आपल्याला पवित्र करण्यासाठी आणि देवाच्या सान्निध्यात आणण्यासाठी येशूने स्वतःचा जीव दिला. त्यामुळेच गुड फ्रायडे हा दुःखद असूनही शुभ दिवस मानला जातो कारण त्याच दिवशी आपला उद्धार शक्य झाला.

Web Title: Why good friday is called as good

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • religions

संबंधित बातम्या

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस
1

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
2

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश
3

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.