Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

21 जूनला वर्षातील सर्वांत मोठा दिवस का म्हणतात? काय आहे यामागील कारण जाणून घ्या

जून महिन्यात उत्तरेकडील भाग सूर्याकडे सर्वात जास्त झुकलेला असतो. या दिवशी सूर्याची किरण थेट पडत असल्याने हा दिवस सर्वांत मोठा असतो. भारतामध्ये उत्तर गोलार्धात हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 21, 2025 | 02:41 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या जीवनामध्ये सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्यप्रकाश केवळ आपल्याला ऊर्जाच देत नाही तर आपला संपूर्ण दिवस त्यानुसार आयोजित केला जातो. आपण पाहिलेच आहे की काही दिवस आपल्याला खूप मोठे दिसतात तर काही दिवस खूप लवकर संपतात. या सर्वांचे कारण केवळ हवामान नसून, पृथ्वीचा वेग आणि कल देखील आहे. सर्व दिवसांपैकी सर्वांत मोठा दिवस म्हणून 21 जूनचा दिवस मानला जातो. यावेळी दिवस सर्वांत मोठा असतो तर रात्र लहान असते. 21 जूनला वर्षातील सर्वांत मोठा दिवस का म्हणतात आणि त्याची कारणे जाणून घेऊया.

21 जून सर्वांत मोठा दिवस का आहे

21 जून या दिवसाला उन्हाळी संक्रांती असे म्हटले जाते. या दिवशी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे सर्वात जास्त कललेला असतो. म्हणूनच या दिवशी सूर्याची किरणे उत्तर गोलार्धात सरळ किंवा लंब पडतात. त्यामुळे भारतामधील अनेक देशांमध्ये या दिवशी सूर्य सर्वात जास्त काळ आकाशात दिसतो. त्याचा परिणाम म्हणजे या दिवशी दिवस मोठा आणि रात्र लहान होते. म्हणूनच 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. उन्हाळी संक्रांतीमधील संक्रांतीचा अर्थ असा होतो की, सूर्याचे एका विशिष्ट स्थितीत येणे. ही खगोलीय घटना वर्षातून दोन वेळेस होते. हे दिवस म्हणजे 21 जून या दिवशी दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते. दुसरा दिवस म्हणजे 21 डिसेंबर म्हणजे हिवाळी संक्रांती या दिवशी रात्र सर्वांत मोठी असते.

Ardhkendra Rajyog: शनि आणि शुक्र तयार करणार शक्तिशाली योग, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ

असे म्हटले जाते की, या दोन्ही दिवसामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना कललेल्या स्थितीत असते. पृथ्वी तिच्या अक्षाकडे 23.5 अंशांनी कललेली असते आणि या कलतेमुळे ऋतू आणि दिवस आणि रात्रीची लांबी निश्चित होते.

21 जूनचा दिवस का आहे विशेष

जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यावेळी एक वेळ अशी येते जेव्हा सूर्याचा कल उत्तर गोलार्धाकडे सर्वात जास्त असतो. 21 जूनला सूर्य कर्क राशीला लंब असतो. या दिवशी सूर्य सकाळी लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो, त्यामुळे दिवस मोठा असतो. भारतामध्ये यावेळी दिवसाची लांबी 13 तासांपेक्षा जास्त असते, तर सामान्य दिवशी ती सुमारे 12 तास असते.

त्रिदित्य योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल उत्तम यश, करिअर आणि व्यवसायात होईल लाभ

या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कोणते

अनेक संस्कृतींमध्ये 21 जूनचा दिवस विशेष मानला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देखील साजरा केला जातो. असे मानले जाते की, हा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये घेतला होता. कारण या दिवशी उर्जेचे संतुलन सर्वोत्तम असते. प्राचीन परंपरेनुसार, अनेक संस्कृतीमध्ये सूर्याची पूजा केली जात असे आणि सर्वात मोठा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात असे कारण हा दिवस शेती, हवामान आणि प्रकाशाशी संबंधित मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Why is june 21 called the longest day of the year astrological reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा
1

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश
2

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या
3

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर
4

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.