फोटो सौजन्य- pinterest
जपानमध्ये 5 जुलै रोजी त्सुनामीचा अंदाज देण्यात आला आहे. याआधीही बेटांवर सतत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे जवळपास 700 हून अधिक वेळा पृथ्वी हादरली आहे.
जपानमध्ये राहणारे लोक बऱ्याच काळापासून भीतीत आहेत. यामागील कारण म्हणजे जपानमधील बाबा वांगा काई मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांनी केलेली भविष्यवाणी. त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या म्हणजेच शनिवार, 5 जुलै रोजी जपानमध्ये भयानक त्सुनामी येणार आहे. यामुळे जपानला जाणारी आणि तेथून येणारी सर्व विमान काही महिने आधीच रद्द करण्यात आलेली आहेत. त्यामुळे जपानच्या दक्षिणेकडील प्रदेशातील टोकारा बेटावरील अकुसेकिजिमा या बेटाजवळ होणाऱ्या सततच्या भूकंपामुळे लोकांची झोप उडालेली आहे.
5 जुलै रोजी केलेल्या त्सुनामीच्या भाकितानुसार, अकुसेकिजिमा बेटावर भूकंपाचे धक्के जाणवले आहे. याची आकडेवारी पाहता 21 जून ते 1 जुलै 2025 पर्यंत 736 वेळा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये 50 हून अधिकवेळा भूकंप झाल्याचे म्हटले गेले आहे. बऱ्याच वेळा भूकंपाची तीव्रता ही 3-5 च्या दरम्यान होती. अकुसेकिजिमा हे ज्वालामुखी बेट आहे, त्याचे समुद्रसपाटीपासून अंतर 150 मीटर उंचीवर आहे. भौगोलिक कारणांमुळे त्सुनामीचा धोका थोडा कमी आहे मात्र भूकंपांच्या वाढत्या वारंवारतेमुळे मोठ्या आपतीची भीती आणखी वाढलेली दिसून येते.
अनेकवेळा हवामानाच्या अंदाजानुसार लोक त्यांच्या प्रवासाचे नियोजन रद्द करत आहे. किनारी भागातून प्रवास करणे टाळत आहे. स्थानिक प्रशासन दक्षता बाळगत आहे.
बेटावर भूकंप येण्याची सुरुवात 21 जूनच्या आसपास झाली आणि पुढे त्याचा वेग वाढत गेला. जपानच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत या क्षेत्रामध्ये 736 वेळा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये 50 हून अधिकवेळा भूकंप झाल्याचे म्हटले गेले आहे. प्रत्येक वेळा भूकंपाची तीव्रता ही 3-5 च्या दरम्यान जाणवत होती असे म्हटले गेले आहे.
र्यो तात्सुकी यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. तिला जपानची बाबा वेंगा म्हटले जाते. तिने कोविड 19, 2011 मधील तोहोकू भूकंप, राजकुमारी डायनाचा मृत्यूच्या आधीच काही भविषवाणी केली होती. कलाकार र्यो तात्सुकी हिने 1999 मध्ये ‘द फ्युचर आय’ या पुस्तकात दावा केला आहे की, 5 जुलैला एक भयानक घटना घडणार आहे. त्यानुसार तिने 2011 मध्ये त्सुनामीपेक्षाही मोठा अनर्थ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)