Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाची यंदा काय आहे थीम ? राज्याच्या नावे आहे कोणता खास रेकॉर्ड ?

महाराष्ट्रात (Republic Day Maharashtra Tableau) आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक ठिकाणांचा समावेश आहे. या देवींच्या भव्य-दिव्य सुंदर प्रतिमांच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे दर्शन यंदा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार आहे.

  • By साधना
Updated On: Jan 24, 2023 | 04:36 PM
maharashtra republic day parade tableau

maharashtra republic day parade tableau

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Parade) नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’  (Maharashtra Chitra Rath 2023) अशी थीम ठरवण्यात आल्याचं राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक ठिकाणांचा समावेश आहे. या देवींच्या भव्य-दिव्य सुंदर प्रतिमांच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे दर्शन यंदा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार आहे. या चित्ररथाविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीतील कर्तव्य पथावर सहभाग घेणार..!
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान
‘साडेतीन शक्तिपीठे’ pic.twitter.com/KPssBy4dx1
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) January 23, 2023

चित्ररथाची मर्यादा, रंगीत तालीम आणि तयारी
चित्ररथांची लांबी ४५ फूट, उंची १६फूट आणि रुंदी १४ फूट अशी मर्यादित केलेली असते. चित्ररथ बांधणीसाठी मिलिटरी कॅन्टोन्मेंटमधील जंगलात  संरक्षण मंत्रालयातर्फे कडक सुरक्षा व्यवस्थेसह मोठा कॅम्प उभारला जातो. कॅम्पमध्ये चित्ररथ बांधणीचे काम करण्यासाठी एक स्वतंत्र सपाट जागा उपलब्ध करून दिली जाते. बांधणीचे काम करणाऱ्या व्यक्तींकरिता, चित्ररथाशी निगडित सादरीकरण करणाऱ्या महिला आणि पुरुष कलाकारांकरिता स्वतंत्रपणे सुविधा दिल्या जातात. डॉक्टरांसह सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा त्यांना दिली जाते. दरवर्षी २३ जानेवारीला संचलनाची रंगीत तालीम होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रमुख पाहुणे इत्यादींच्या पेहरावातील कलाकार त्यात परफॉर्म करतात. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मूळ विषयाला अनुरूप संगीत, नाट्य आणि नृत्याचे सादरीकरण केले जाते. प्रत्येक चित्ररथाला ५८ ते ६२ सेकंद अशी वेळ दिलेली असते.

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती’ महाराष्ट्राचा चित्ररथ.#RepublicDay pic.twitter.com/dcuQ8G6t7W — DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) January 22, 2023

महाराष्ट्राचा खास रेकॉर्ड
हे संचलन १९५० पासून सुरू आहे, पण १९९३ ते ९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राने चित्ररथासाठी पारितोषिक पटकावले आहे. हा विक्रम आजवर कोणत्याही राज्याला मोडता आलेला नाही. महाराष्ट्राच्या योगदानावरचा पहिला चित्ररथ १९८६ साली राजपथावर प्रदर्शित झाला. २०१८ सालापर्यंत माझी एकूण वीसएक डिझाइन्स निवडली गेली. त्यापैकी सहा चित्ररथांना पारितोषिके मिळाली. १९९३, १९९४ आणि १९९५ ही सलग तीन वर्ष अनुक्रमे ‘गणेशोत्सव’, ‘हापूस आंबा’ आणि ‘बापू’ या चित्ररथांवर महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांकाची मोहर उमटवून हॅट्रिक केली.

[read_also content=”ऑटो आणि टॅक्सी चालकांची कमाई घटली, मिळेनात ग्राहक, मुंबईकरांची मेट्रोला वाढती पसंती https://www.navarashtra.com/maharashtra/auto-rickshaw-and-taxi-drivers-income-reduced-mumbaikar-giving-preference-to-metro-nrsr-364149/”]

दरम्यान, २०१४ साली महाराष्ट्राच्या चित्ररथात नारळी पौर्णिमेचे दर्शन देशाला घडले, २०१५ साली पंढरीची वारी सर्वश्रेष्ठ ठरली, तर २०१८ साली शिवराज्याभिषेकाच्या विषयाला प्रथम पारितोषिक मिळाले. २०२२ साली कास पठाराच्या विषयाद्वारे राज्याच्या जैवविविधतेचा चित्ररथ पुरस्कारप्राप्त ठरला नसला, तरी त्याचे कौतुक झाले होते.

Web Title: Maharashtra chitra rath 2023 theme and recrod of chitrarath done by maharashtra nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2023 | 04:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.