किटकांवर निर्भर असलेला लहानसा खादाड 'योद्धा' कोळी; निसर्गाचा किटकनाशक
तुम्ही घरापासून ते जंगालांपर्यंत अनेक ठिकाणी कोळी पाहिले असतील. या कोळ्याच्या अनेक प्रजाती आहेत.पण तुम्हाला माहित आहे का की, हा निसर्गाचा किटनाशक माणसापेक्षा, इतर प्रण्यांपेक्षा पण खादाड आहे. कोळी हा छोटा जीव असला तरी, त्याच्या खाण्याची क्षमता माणसाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. एखाद्या माणसाने ज्या प्रमाणात अन्न सेवन करतो त्याच्या दुप्पट वजनाच्या कीटकांचा आहार कोळी रोजच्या रोज करतो.
कोळ्याचे भक्ष्य मिळवण्याचे मुख्य शस्त्र
माणूस आपल्या आहारात ठराविक मर्यादा राखत असतो, परंतु कोळी मात्र सतत भक्ष्य शोधत असतो. कोळीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे जाळे. त्याने विणलेले जाळे हे त्याचे मुख्य शस्त्र आणि भक्ष्य मिळवण्याचे साधन असते. एखादी माशी, पतंग किंवा छोटा किडा त्याच्या जाळ्यात फसला की, कोळी मोठ्या चपळाईने त्याच्यावर झेप घेतो. कोळीच्या तोंडातील विषाद्वारे तो कीटकांना निष्प्राण करतो आणि त्यानंतर त्यांच्या शरीरातील द्रव्ये शोषून घेतो. कोळ्याचे पचनसंस्थान एवढे प्रगल्भ असते की, त्याला सतत भक्ष्य मिळाले तरी त्याचे पचन व्यवस्थित होते.
हे देखील वाचा- पक्ष्यांच्या दुनियेतील रहस्य: एक असा पक्षी जो मागच्या दिशेनेही उडतो; जाणून घ्या कसे?
निसर्गाचा कीटकनाशक
कोळीची ही खादाड वृत्ती निसर्गाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. तो माश्या, पतंग, मच्छर, मुंग्या आणि इतर अनेक कीटकांचा नाश करतो. अशा रीतीने, कोळी एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून ओळखला जातो. विशेषतः शेतीमध्ये, कोळीच्या या कार्यामुळे किटकनाशकांचा वापर कमी होऊ शकतो. कारण तो स्वतःच नैसर्गिक पद्धतीने कीटकांवर नियंत्रण ठेवतो. कोळीच्या उपद्रवामुळे शेतीतील उत्पादनास हानी पोहोचवणारे कीटक कमी होतात, त्यामुळे शेतीला अप्रत्यक्ष फायदा होतो.
कोळीची जीवनशैली सततच्या आहारावर अवलंबून असते
माणूस जरी प्रगत आणि बुद्धिमान प्राणी असला तरी, त्याच्याकडे कोळीइतकी सततची खाण्याची क्षमताच नसते. त्याचा आहार ठराविक वेळेत, मर्यादित प्रमाणात घेतला जातो. याउलट, कोळीची जीवनशैली सततच्या आहारावर अवलंबून असते. एका रात्रीत किंवा दिवसात तो आपल्या वजनाच्या दुप्पट इतकं भक्ष्य सेवन करू शकतो. त्यामुळे त्याला माणसापेक्षा अधिक खादाड म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कोळीच्या या खादाड स्वभावामुळे, तो फक्त स्वतःचे जीवन टिकवतोच, पण एक प्रभावी कीटकनाशक म्हणूनही निसर्गात योगदान देतो. त्याच्या या नैसर्गिक योगदानामुळे पर्यावरणातील जैवविविधता टिकवण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या घराच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या कोळ्याला कधीकधी त्रासदायक वाटलं तरी, त्याची उपयुक्तता आणि त्याची निसर्गासाठीची जबाबदारी ओळखून, त्याला त्याचं कार्य करू देणं हे योग्य ठरतं.
हे देखील वाचा- मधासाठी मधमाशांच्या पोळ्याशी लढणारा दुर्मिळ ‘हनी बॅजर’; निसर्गातील शूरवीर योद्धा