फोटो सौजन्य: iStock
निसर्गात अशा अनेक अद्भुत आणि अनोख्या गोष्टी आहेत, ज्यांचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. आपल्याला पृथ्वीने अनेक गोष्टी देणगी म्हणून दिल्या आहेत. नद्या, नाले, झाडे, फुले, फळे, पक्षी-प्राणी यांसारख्या गोष्टी आपल्याला लाभल्या आहेत. प्रत्येकाचे वैशिष्ट्य हे वेगळे असते. आज आपण अशाच एका अद्भुत पक्षाविषयी जाणून घेणार आहोत. हा पक्षी मागच्या दिशेने देखील उडतो. होय, तुम्ही बरोेबर ऐकले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात अशा अनोख्या पक्ष्याबद्दल जो उलट्या दिशेने देखील उडू शकतो.
तर या अद्भुत पक्ष्याचे नाव हमिंगबर्ड आहे. जो मागे उडण्याची क्षमता असणारा एकमेव पक्षी आहे. हमिंगबर्डचा उडण्याचा कौशल्यपूर्ण आणि अनोखा पद्धत त्याला इतर पक्ष्यांपासून वेगळं करते. जगभरातील विविध पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांसाठी हमिंगबर्ड नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्यांच्या अद्वितीय उडण्याच्या कौशल्यामुळे ते पक्ष्यांच्या दुनियेत एक वेगळं स्थान टिकवून आहेत.
हमिंगबर्डचे वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि पंख
हमिंगबर्डचा आकार अत्यंत लहान असतो. साधारणपणे 7.5 सेंटीमीटर ते 13 सेंटीमीटर लांब असणारा हा पक्षी 2 ते 20 ग्रॅम वजनाचा असतो. या पक्ष्यांच्या लहान पण अत्यंत शक्तिशाली पंखांमुळे ते हवेत स्थिर राहून फुलांमधून मकरंद (nectar) शोषण करण्यास सक्षम असतात. हमिंगबर्डचे पंख एका सेकंदात 50 ते 80 वेळा फडफडतात. यामुळे हे पक्षी त्यांच्या गतिशील उडण्याची क्षमता वाढते. अन्य कोणत्याही पक्ष्यांच्या तुलनेत, हमिंगबर्ड हे मागे, पुढे, वर, खाली अशा सर्व दिशांमध्ये सहजपणे उडू शकतात.
या पक्ष्यांच्या पंखांची खास रचना त्यांना इतर पक्ष्यांपेक्षा अधिक लवचिक आणि वेगळे बनवते. हमिंगबर्डचे पंख त्यांच्या खांद्यावर अशा प्रकारे जोडलेले असतात की ते कोणत्याही दिशेला फिरू शकतात. यामुळेच त्यांना मागे उडण्याची अनोखी क्षमता मिळते. ही क्षमता इतर कोणत्याही पक्ष्यात आढळत नाही. हमिंगबर्डचा आहार मुख्यतः फुलांमधील मकरंदावर( अन्न) अवलंबून असतो. त्यांच्या लांब आणि बारीक चोचीमुळे ते फुलांच्या आत खोलवर शिरून मकरंद शोषू शकतात. हे पक्षी त्यांच्या पंखांच्या अद्वितीय गतीमुळे ते हवेत स्थिर राहून मकरंद गोळा करू शकतात. तसेच छोट्या कीटकांचाही ते आहार घेतात. या पोषणामुळे त्यांना सतत उडण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते.
निसर्गातील आकर्षण
हा पक्षी अमेरिका खंडात विशेषत: हमिंगबर्डच्या विविध प्रजाती आढळतात. या पक्ष्यांच्या शरीरावर असलेल्या चमकदार रंगांच्या पिसांमुळे ते अधिक आकर्षक दिसतात. त्यांची रंगसंगती आणि लहान आकारामुळे त्यांना पाहणे एक अद्भुत अनुभव असतो. अनेक पक्षीप्रेमी हमिंगबर्डला त्यांच्या बागेत आकर्षित करण्यासाठी फुलांच्या विशेष प्रकारची लागवड करतात.हमिंगबर्ड हा निसर्गातील एक चमत्कारच आहे. त्यांची मागे उडण्याची क्षमता आणि गतिशील उडण्याचे कौशल्य त्यांना पक्षी जगतात अनोख्या श्रेणीत आणते. अशा अद्वितीय वैशिष्ट्यांसाठीच हमिंगबर्डचा अभ्यास करणं वैज्ञानिक आणि निसर्गप्रेमींना नेहमीच प्रेरणादायक वाटतं.