Atal bihari vajpayee birth anniversary : आज देशभरात अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती साजरी केली जात आहे. अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील एक महान नेते आणि प्रभावशाली विचारवंत होते. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी झाला. प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांनी अटल आणि राजकुमारी कौल यांच्यातील नात्याचे वर्णन एक उत्तम ‘लव्हस्टोरी’ असे केले आहे. पण शेवटपर्यंत राजकुमारी कौल आणि अटलजींची ही प्रेमकहानी अपुरीच राहिली. त्याकाळातील अनेक दिग्गज पत्रकारांनी त्यांच्या या प्रेमकहाणीचं वर्णन आपल्या अनेक लेखांमधून मांडलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात अटलबिहारी वापजेयी यांच्या प्रेमकथेचा उल्लेख केला होता. हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील व्हिक्टोरिया कॉलेजचे आहे, याच कॉलेजमध्ये अटलबिहारी वापजयी यांच्या प्रेमात पडले होते, शिक्षणादरम्यान त्यांची भेट राजकुमारी कौल यांच्याशी झाली, त्यानंतर दोघांची मैत्री झाली, त्यांची मैत्री वाढली – त्याचे रुपांतर प्रेमात झाले. आणि मग विद्यार्थी अटलबिहारी वापजेयी यांची प्रेमकहाणी इथून सुरू झाली.
LG चा पहिला ट्रान्सपरंट TV लाँच, किंमत 50 लाखांहून अधिक; काय आहे खास? जाणून घ्या
या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे की, वाढत्या प्रेमाच्या पार्श्वभूमीवर अटलजींनी राजकुमारी कौल यांना प्रेम व्यक्त करण्यासाठी एक प्रेमपत्र लिहिले, राजकुमारी कौल यांनी त्यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही, तरीही अटलजींनी वर्षानुवर्षे प्रतिक्रियेची आयुष्यभर वाट पाहिली आणि वाट पाहत राहिले. दरम्यान राजकुमारी कौलचे प्रोफेसर ब्रिज नारायण कौल यांच्याशी लग्न झाले आणि त्यानंतर अटलजींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
अटलजी आणि राजकुमारी कौल यांच्यातील मैत्री लग्नानंतरही कायम राहिली. राजकुमारी कौलं आपल्या पतीसोबत अटलजींना भेटायला जात असे. याशिवाय राजकुमारी कौल यांचे जवळचे मित्र आणि उद्योगपती संजय कौल यांनी सांगितले होते की, राजकुमारी कौल यांना अटलसोबत लग्न करायचे होते, परंतु त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. कौल स्वतःला श्रेष्ठ समजत. अटलबिहारी वाजपेयी हे सुद्धा ब्राह्मण असले तरी कौल स्वतःला त्यांच्यापेक्षा वरचे समजत होते. त्यानंतर अटलजींनीही लग्न केले नाही.
Christmas 2024 : ईश्वराचा पुत्र म्हटल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या जन्माची अद्भुत कहाणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐंशीच्या दशकात एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राजकुमारी कौल यांनी त्यांच्या नात्याबद्दल कबूलही दिली होती. त्यांचे आणि वाजपेयी यांच्यातील नाते नक्कीच घट्ट होते. पण ते फार कमी लोकांना समजले. पण “वाजपेयी आणि मला माझ्या पतीला या नात्याबद्दल कधीही स्पष्टीकरण द्यावे लागले नाही. माझे आणि माझे पती यांचे वाजपेयींसोबत खूप घट्ट नाते होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाजपेयींना दिल्लीत मोठे सरकारी घर मिळाल्यावर राजकुमारी कौल, त्यांचे पती ब्रज नारायण कौल आणि त्यांच्या मुली वाजपेयींच्या घरी शिफ्ट झाल्या. त्या सर्वांच्या घरात स्वतःची बेडरूम होती.
अटलजी त्यांच्या वक्तृत्वासाठी खूप प्रसिद्ध होते, वाजपेयींच्या पाकिस्तानबद्दल अटल बिहारींची कहाणीही खूप चर्चेत होती. पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी बस प्रवास सुरू केला. वाजपेयी स्वतः बसने लाहोरला गेले होते, तिथे एका पाकिस्तानी मीडियाच्या महिला पत्रकाराने त्यांना लग्नासाठी प्रपोज केले आणि म्हटले, ‘मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आहे, पण मला संपूर्ण काश्मीर हवा आहे, यानंतर अटलजी म्हणाले की मी लग्नासाठी तयार आहे. पण मला अख्खा पाकिस्तान हुंडा म्हणून हवा आहे,” त्यांच्या या उत्तराची जगभरात चर्चा झाली होती.
ख्रिसमसच्या दिवशी या लोकांना त्रिकोण योगाचा लाभ
अटलजी आणि राजकुमारी कौल यांच्यांबाबत प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांनी सांगतात की, राजकुमारी कौल या अटलजींना खूप आवडत होत्या हे त्या वेळी सर्वांना माहीत होते. राजकुमारी कौल अटल बिहारींसाठी सर्वस्व होत्या. त्यांनी अटलजींची उत्तम सेवा केली. त्यांच्या निधनापर्यंत त्या अटलजींसोबत होत्या 2014 मध्ये राजकुमारी कौल यांचेनिधन झाले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराला भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि सुषमा स्वराज उपस्थित होते.