LG चा पहिला ट्रान्सपरंट TV लाँच, किंमत 50 लाखांहून अधिक; काय आहे खास? जाणून घ्या
LG Signature series अंतर्गत या ब्रँडकडे काही सर्वोत्कृष्ट नेक्स्ट-जेन टीव्ही आहेत. LG सिग्नेचर सिरीज अंतर्गत काही सर्वोत्कृष्ट नेक्स्ट-जेन टीव्ही आहेत. यामध्ये 2019 मध्ये लाँच केलेला रोलेबल स्क्रीनवाला OLED TV R आणि जानेवारी 2024 घोषणा केलेला ट्रान्सपरंट स्क्रीन वाला OLED T यांचा समावेश आहे. OLED T LG चा पहिला ट्रान्सपरंट OLED TV आता अखेर ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला तर मग या पहिल्या आगळ्या वेगळ्या ट्रान्सपरंट स्क्रीनवाल्या टिव्हीची किंमत, उपलब्धता, स्पेक्स आणि प्रमुख फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
Oppo A5 Pro 5G: Oppo चा नवीन प्रिमियम स्मार्टफोन लाँच, स्पेसिफीकेशन्स वाचून व्हाल हैराण
LG Signature OLED T या महिन्यापासून यूएसमध्ये उपलब्ध होत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की लवकरच या यादीत इतर बाजारपेठांचाही समावेश केला जाणार आहे. LG OLED T ची US मध्ये किंमत 60,000 डॉलर म्हणजेच अंदाजे 51,10,800 रुपये आहे. OLED TV R एकेकाळी भारतातील प्रमुख ब्रँड मानला जात होता. त्यामुळे हा नवीन ट्रान्सपरंट स्क्रीनवाला टीव्ही देखील भारतात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. भारतात OLED T च्या उपलब्धतेबाबत कंपनीने अद्याप काहीही सांगितलेले नाही. मात्र भारतीयांना आशा आहे की, हा टिव्ही लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो.
डिझाईन: स्टँडशिवाय, टीव्हीचे वजन सुमारे 60 किलो आणि 69.6 x 41.1 x 10.3 इंच आहे.
डिस्प्ले: LG OLED T मध्ये 77-इंच 4K OLED पॅनेल आहे जे एका बटणाद्वारे पारदर्शक आणि अपारदर्शक मोडमध्ये स्विच केले जाऊ शकते. स्क्रीनमध्ये 4K अल्ट्रा HD (3,840 x 2,160) रिझोल्यूशन आणि 120Hz नेटिव्ह रीफ्रेश रेट आहे. डॉल्बी व्हिजन आणि 4K AI सुपर अपस्केलिंग वैशिष्ट्य देखील येथे प्रदान केले आहे. ते सर्व एलजीच्या अल्फा 11 प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत.
गेमिंग फीचर्स: टीव्ही 4K120Hz गेमप्ले, व्हेरिएबल रिफ्रेश रेट (VRR), ऑटो लो लेटन्सी मोड (ALLM), अडॅप्टिव्ह सिंक आणि 0.1ms पेक्षा कमी रिस्पॉन्स टाइमला सपोर्ट करतो.
विशेष वैशिष्ट्ये: या ट्रान्सपरंट स्क्रीनवाल्या टिव्हीमध्ये टी-ऑब्जेक्ट (फोटो किंवा आर्ट गॅलरीसह नेहमी-ऑन डिस्प्ले मोड), टी-बार (नोटिफिकेशन्स, स्पोर्ट्स अपडेट, वेदर अपडेट इ.), टी-होम (उपलब्ध सर्विसेज आणि ॲप्स आणि सेटिंग्जसाठी क्विक टॉगल) समाविष्ट आहेत.
ऑडिओ: टीव्हीमध्ये डॉल्बी ॲटमॉस, डीटीएस: एक्स आणि AI ॲन्हांस्डसाठी सपोर्ट असलेले डाउनवर्ड-फायरिंग 4.2 चॅनेल स्पीकर आहेत.
कनेक्टिव्हिटी: सर्व I/O पोर्ट आणि मॉड्यूल वेगळ्या ‘झिरो कनेक्ट’ बॉक्सचा भाग आहेत, ज्यात HDMI (QMS (क्विक मीडिया स्विचिंग) आणि eARC सह), ब्लूटूथ 5.1, USB 2.0, Wi-Fi 6E आणि इथरनेट समाविष्ट आहे.