Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदू मुस्लीम सौहार्दाचे अनोखे प्रतीक! ‘या’ गावांमध्ये चक्क मशिदींमध्ये विराजमान होतात गणपती बाप्पा

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. सर्वत्र बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु असून घरांमध्ये बप्पासाठी खास मोदकही तयार केले जात आहे. त्यांच्या विराजमानासाठी खास पाठ सजवला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2025 | 04:29 PM
Ganpati Idol Install in mosques in Maharashtra's villages

Ganpati Idol Install in mosques in Maharashtra's villages

Follow Us
Close
Follow Us:

यंदा गणेश चतुर्थीचा सण 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. यासाठी आता केवळ दोन दिवसच राहिले आहेत. हा सण केवळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. दरम्यान या सणानिमित्त देशभरात जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. याच वेळी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्येही ऐक्याची भावना पाहायला मिळते. तसे पाहाता महाराष्ट्रात गेल्या अनेक काळापासून हिंदू-मुस्लिम वाद आहे. पण सणावाराला दोन्ही धर्माचे लोक मतभेद विसरुन एकत्र येतात. दोन्ही धर्माचे लोक आनंदाने एकमेकांचे सण साजरे करतात.

याच हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचे दृश्य महाराष्ट्राच्या दोन गावांमध्ये पाहायला मिळते. येथे मशिदींमध्ये गणपती बप्पांना विराजमान केले जाते.
ऐकून आश्चर्य वाटले असले. पण हे खरे आहे. आज आपण ही अनोखे परंपरा काय आहे, कधी सुरु झाली आणि कुठे हे जाणून घेणार आहोत.

Baby Names On Lord Ganesha: बाप्पावरून प्रेरित बाळांची शुभं नावं, गणेश चतुर्थीला जन्म झाल्यास मिळवा आशीर्वाद

या जिह्ल्यात मशिदींमध्ये विराजमान होतात बप्पा

तर महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दृश्य पाहायला मिळते. गेल्या ४० वर्षापासून येथे एक अनोखी परंपरा सुरु आहे. येथील गावांमध्ये मशिंदीमध्ये गणपत्ती बप्पांच्या मूर्ती बसवल्या जातात. हिंदू आणि मुस्लिम नागरिक एकत्र येऊन बप्पाचे थाटामाटात स्वागत करतात, त्यांची पुजा करतात. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाहायला मिळते.

काय आहे ही पंरपरा आणि कधी सुरु झाली?

तर याची कथाही तिथकीच मनोरंजक आहे. सांगलीच्या वाळवा तहसीलमध्ये गोटखिंडी नावाचे एक गाव आहे. या गावातील मशिदींमध्ये गणपती बप्पाची मूर्ती बसवली जाते.  १९६१ मध्ये गोटखिंडीमध्ये गावामध्ये चौकाचौकात गणपती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यासाठी अगदी कमी वेळात आणि कमी काळात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणपती बप्पाची मूर्ती बाहेरच ठेवण्यात आली होती. पण रात्री अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. गणपती बप्पाची मूर्ती पावसात भिजत होती. याच वेळी तिथेच निजाम पठाण नावाच्या मुस्लिम व्यक्तीने बप्पाच्या मुर्ती भिजताना पाहिली.

यानंतर निजामने मुर्तीला मशिदीत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मूर्ती संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान मशिदीतच राहिली. लोकांनी या काळात येऊन त्याची पुजाही केली, प्रसादही वाटला. यावेळी मुस्लिम लोकांनीही यामध्ये सहभाग घेतला होता.

परंतु यानंतर १९८६ पर्यंत या अनोख्या आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले नाही. १९८६ मध्ये गावातील काही तरुणांनी पुन्हा
या ऐतिहासिक वारश्याची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेतला.

तरुणांनी गणेश मंडळाची स्थापना केली. इलाही पठाण नावाच्या या मुलाला समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. तेव्हापासून गोटखिंडमध्ये मशिदीमध्ये बप्पाला विराजमान केले जाऊ लागले. ही ओनेखी परंपरा पाहून आसपासच्या गावातील हिंदू आणि मुस्लिमांनी देखील मशिदीत गणेशमूर्ती ठेवण्यास सुरुवात केली. १९८६  पासून सुरु झालेली ही परंपरा आजही सुरु आहे.

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

Web Title: Ganesh chaturthi 2025 ganpati idol install mosques in maharashtras villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Festival

संबंधित बातम्या

Shilpa Shetty च्या घरी येणार नाही बाप्पा! मोडणार परंपरा, स्वतःच कारण देत केला खुलासा; झाली भावूक
1

Shilpa Shetty च्या घरी येणार नाही बाप्पा! मोडणार परंपरा, स्वतःच कारण देत केला खुलासा; झाली भावूक

Baby Names On Lord Ganesha: बाप्पावरून प्रेरित बाळांची शुभं नावं, गणेश चतुर्थीला जन्म झाल्यास मिळवा आशीर्वाद
2

Baby Names On Lord Ganesha: बाप्पावरून प्रेरित बाळांची शुभं नावं, गणेश चतुर्थीला जन्म झाल्यास मिळवा आशीर्वाद

Hartalika 2025: तुम्ही हरतालिकेचा उपवास पहिल्यांदा करत आहात का? लक्षात ठेवा हे नियम
3

Hartalika 2025: तुम्ही हरतालिकेचा उपवास पहिल्यांदा करत आहात का? लक्षात ठेवा हे नियम

Konkan Ganeshotsav: ‘जगात भारी कोकणचा गणेशोत्सव’! आरत्या, भजनांचे सूर आणि…; शेकडो वर्षांची परंपरा
4

Konkan Ganeshotsav: ‘जगात भारी कोकणचा गणेशोत्सव’! आरत्या, भजनांचे सूर आणि…; शेकडो वर्षांची परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.