International Ozone Preservation Day Know importance of ozone in our life
तुम्ही शाळेत विज्ञानाचा अभ्यास करताना ओझोन थराबद्दल नक्कीच शिकला असाल, जो थर आपल्या पृथ्वीचे एक रक्षा कवच म्हणून काम करतो. पण तुम्हाला माहित आहे का हा थर काय आहे, कसा तयार होता, आणि त्याचे आपल्या जीवनात महत्त्व काय आहे. तुम्हाला याची उत्तर जाणून घ्यायची असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या दिनाचा उद्देशही लोकांना ओझोन थराचे महत्त्व पटवून देणे आणि त्याच्या संवर्धनासााठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आहे. चला तर मग जाणून घेऊयात पृथ्वीच्या सुरक्षा कवच बद्दल, जो आपले सूर्याच्या घातक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांपासून रक्षण करतो.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ओझोन थर म्हणजे काय?
पृथ्वीचा कवच मानला जाणारा ओझोन थर हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० ते ४० किलोमीटर उंचीवर पसरलेला आहे. या थराला स्ट्रॅटोस्फियर म्हणतात. हा थर ३मिलीमीटर इतका जाड असतो, ज्यामुळे सूर्याच्या अतिनील/हानिकारक UV किरणांपासून पृथ्वीवरच्या मानवी, सागरी जीवनाचे रक्षण होते. या किरणांमुळे मानवांमध्ये कर्करोग मोतीबिंदूसारखे आजार निर्माण होतील.
कसा तयार होतो ओझोन थर?
ओझोन थर हा एका रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार होतो. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे याची उत्पत्ती होते. वातावरणातील ऑक्सिजणचे अणू (O2) या अतिनील किरणांमुळे तुटतात आणि स्वतंत्र ऑक्सिजन अणू (o) तयार होतो. यानंतर हे दोन्ही अणू एकत्र येतात (O+O2=O3) आणि ओझोन थर तयार करतात. ही प्रक्रिया वातावरणात सतत सुरु असते. यामुळो पृथ्वीचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते.
ओझोन थराचे नष्ट झाल्यास काय होईल?
ओझोन थराला कशामुळे नुकसान होते?
ओझोन थराचे नुकसान क्लोरोफ्लोरोकार्बन (CFEs), हॅलोन सारख्या रसायनांमुळे नष्ट होण्याची शक्यता असते. हे रसायनिक पदार्थ रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि एरोसोल स्प्रे मध्ये वापरले जातात. यामुळे १९८० च्या दशकात अंटार्क्टिकामध्ये ओझोन होल तयार झाला होता. यामुळे अनेक वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली होती. यासाठी उपाय म्हणून तुम्ही काही गोष्टी करु शकता.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा