वारकरी सांप्रदायातील एक प्रमुख संत म्हणजे संत गोरा कुंभार यांनी तेर पंढरपूर येथे समाधी घेतली (फोटो - टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. संसार करताना परमार्थ साधण्याचा गुरुमंत्र या सर्व संतांनी दिला. वारकरी सांप्रदायातील एक महत्त्वपूर्ण संत म्हणजे संत गोरा कुंभार. व्यवसायाने कुंभार असलेले गोरा कुंभार यांनी आपल्या कार्यातून आणि भक्तीतून समाजाला समानतेचा संदेश दिला. विठ्ठलभक्ती हे त्यांच्या जीवनाचे केंद्र होते.
त्यांच्या अभंगरचनांमध्ये साधेपणा, भक्तीभाव आणि सामाजिक समता यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी आपल्या अभंगातून अहंकार त्याग, ईश्वरभक्ती आणि प्रामाणिक जीवन यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या रचनांनी वारकरी परंपरेला समृद्ध केले आहे. परंपरेनुसार, त्यांनी पंढरपूरजवळील तेर (उस्मानाबाद) येथे समाधी घेतली असल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे समाजात भक्तीची जागृती झाली आणि आजही त्यांच्या अभंगातून प्रेरणा मिळते.
10 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
10 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
10 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






