War is evolving and the army must adapt Rajnath Singh
चेन्नई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आता युद्धाचे स्वरूप बदलले आहे. पारंपारिक युद्धांऐवजी ग्रे झोन वॉरफेअर, हायब्रिड वॉरफेअर असे युद्धाचे नवे स्वरूप असेल. अशा युद्धांमध्ये अंतराळ युद्ध, सायबर हल्ले आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या मोहिमा यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. आर्थिक युद्ध हा देखील याचाच एक भाग आहे. भविष्यातील या युद्धांचा मुकाबला करण्यासाठी सैन्याला सज्ज राहावे लागेल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील डिफेन्स कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले की, नवीन युगातील युद्धाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. गोळी न चालवताही युद्ध करता येते आणि त्याचे परिणामही बदलता येतात. तंत्रज्ञान युद्धाची दिशा देखील बदलू शकते हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे, तांत्रिक त्सुनामी आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे, आवश्यक आहे, असे सांगतानाच आपण या तीन मुद्द्यांचा नीट अभ्यास केला आणि त्यांची अंमलबजावणी केली तर आपण खूप पुढे जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
आधुनिक काळात, फ्रैंक जी. हॉफमन यांना हायब्रिड वॉरफेअर या शब्दाचे जनक मानले जाते. २००७ मध्ये त्यांनी ‘कॉर्नफ्लक्ट इन द २१ सेंच्युरीः द राईज ऑफ हायब्रिड वॉर्स’ या त्यांच्या संशोधन पत्रात पहिल्यांदा म्हटले होते की हायब्रिड युद्धात पारंपारिक युद्धपद्धती, विचित्र रणनीती, दहशतवादी कारवाया, हिंसाचार पसरवणे यांचा समावेश आहे, याचा संदर्भ राजनाथ सिंह यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Ram Mandir: पाकिस्तानात बांधले जात आहे भव्य राम मंदिर! भारतातून आणली जाणार ‘ही’ खास वस्तू
सध्याच्या आधुनिक युगात युद्धाच्या परिभाषा बदलत आहेत. पारंपरिक रणांगणावर लढल्या जाणाऱ्या युद्धांव्यतिरिक्त आता हायब्रिड युद्ध ही संकल्पना समोर येत आहे, जिथे समोरच्या प्रतिस्पर्ध्याशिवाय एक अदृश्य शत्रू कार्यरत असतो. हा शत्रू केवळ सैनिक नसून, तो देशाच्या आंतरिक सुरक्षेला धक्का देणाऱ्या विविध गटांच्या स्वरूपात असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनने बांधला जगातील सर्वात उंच पूल; स्वतःचाच विक्रम मोडण्यास सज्ज, पाहा VIDEO
हायब्रिड युद्धामध्ये संपर्कबाह्य घटकांचा वापर केला जातो. सायबर हल्ले, अपप्रचार, दहशतवादी गट, बंडखोर संघटना आणि स्थानिक अस्थिरता पसरवणारे अघोषित घटक यांचा यात समावेश असतो. या युद्धतंत्राचा हेतू थेट सैनिकी आक्रमण न करता देशाला आतून कमकुवत करणे असा असतो. त्यामुळे लक्षित देशामध्ये अस्थिरता निर्माण होते, आर्थिक उलथापालथ होते आणि समाजामध्ये विभाजन वाढते. विशेष म्हणजे, या अदृश्य शत्रूंचा सामना करणे पारंपरिक सैनिकी उपायांनी शक्य होत नाही. या संदर्भात सक्षमता, सायबर सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा आणि राष्ट्रीय ऐक्य यावर भर देणे गरजेचे आहे. हायब्रिड युद्ध हे भविष्यातील आव्हान आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाने अधिक चोख रणनीती अवलंबण्याची गरज आहे.