चीनने बांधला जगातील सर्वात उंच पूल, स्वतःचाच विक्रम मोडण्यास सज्ज, पाहा VIDEO ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बीजिंग : जगभरात अभियांत्रिकी कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला आहे. जगातील सर्वात उंच पूल – हुआइजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज आता जनतेसाठी खुला होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या पुलाच्या उद्घाटनानंतर चीन पुन्हा एकदा स्वतःचा विक्रम मोडणार असून, आजही सर्वात उंच पुलाचा मान चीनकडेच आहे.
चीनमधील हुआइजियांग येथे हा २.९ किलोमीटर लांब आणि २,०५० फूट उंच पूल बांधला गेला आहे. या पुलाची उंची इतकी आहे की, बांधकामादरम्यान ढग त्यावरून जाताना दिसत होते. पुलाच्या मध्यभागी एकूण ९३ भागांचा समावेश आहे आणि त्याचे एकूण वजन २२,००० टन आहे, जे आयफेल टॉवरच्या वजनाच्या तिप्पट आहे. ब्रिटिश मीडिया आउटलेट द सनच्या अहवालानुसार, हा पूल लंडनच्या गोल्डन गेट ब्रिजपेक्षा ९ पट अधिक उंच आहे. तसेच, हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा दुप्पट उंच आहे. त्यामुळे हा पूल जगभरातील अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी एक मोठे आश्चर्य मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका बनवत आहे हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली विनाशकारी शस्त्र, कोण आहे लक्ष्य?
China’s Huajiang Grand Canyon Bridge is set to open this year, becoming the world’s tallest bridge at 2050 feet high.
Recent footage of the bridge has been released, showing crews putting on the finishing touches.
One of the most insane facts about the bridge is that… pic.twitter.com/DLWuEV2sXQ
— Collin Rugg (@CollinRugg) April 8, 2025
credit : social media
सध्या जगातील सर्वात उंच पुलाचा मान चीनकडेच आहे. हुआइजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज हा गुइझोउ प्रांतातील बेइपानजियांग ब्रिजच्या उत्तरेस ३२० किलोमीटर अंतरावर बांधण्यात आला आहे. बेइपानजियांग पूल १७८८ फूट उंच आहे आणि तो २०१६ मध्ये पूर्ण झाला होता. आता, हुआइजियांग पूल त्याहूनही जास्त उंच असल्याने, चीन पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडणार आहे.
हुआइजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज हा केवळ अभियांत्रिकी चमत्कार नसून, स्थानिकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या, या विशाल दरीतून प्रवास करण्यासाठी एक तास लागत आहे, मात्र हा पूल खुला झाल्यानंतर हे अंतर फक्त २ ते ३ मिनिटांत पार करता येईल. त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा २९२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹२४३० कोटी) खर्चून उभारण्यात आलेला पूल २०२२ मध्ये बांधायला सुरुवात करण्यात आली. केवळ तीन वर्षांत हा पूल उभारण्याचा चमत्कार चीनने घडवला आहे. या वेगवान आणि अद्भुत बांधकामामुळे चीनने पुन्हा एकदा जगभरातील अभियंत्यांना अचंबित केले आहे.
चीन सतत आपल्या अभियांत्रिकी क्षमतेचा विकास करत असून, यामुळे त्यांची वाहतूक यंत्रणा अधिक जलद, सुरक्षित आणि सक्षम होत आहे. या पुलाच्या माध्यमातून चीन जगभरातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात एक नवा मापदंड प्रस्थापित करत आहे. हा पूल केवळ वाहतुकीसाठी नव्हे, तर पर्यटनासाठीही एक मोठे आकर्षण ठरणार आहे. जगभरातील पर्यटक आणि अभियंते या अभूतपूर्व संरचनेला प्रत्यक्ष पाहण्यासाठी उत्सुक असतील. चीनने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते अव्वलस्थानी आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारमधील भूकंपानंतर तज्ज्ञांनी भारतालाही दिला धोक्याचा इशारा; मोठ्या प्रमाणात विनाश होण्याची शक्यता
हुआइजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज हा चीनच्या अभियांत्रिकी सामर्थ्याचा उत्कृष्ट नमुना आहे. हा पूल उघडल्यानंतर तो केवळ वाहतुकीस मदत करणार नाही, तर चीनच्या प्रगतीचे आणि तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाचे प्रतीक ठरेल. पुढील काही वर्षांत चीन आणखी अशा मोठ्या प्रकल्पांची घोषणा करू शकतो, त्यामुळे जगभरातील अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी चीनचे पाऊलखुणा नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहेत.
credit : social media and Youtube.com