Why is International Day of Democracy celebrated learn about it's history
२००७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस मान्यता दिला आणि २००८ पासून तो अधिकृतरीत्या सुरू झाला.
या दिवसाचा उद्देश जगभरात लोकशाही, मानवी हक्क आणि सुशासन याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
International Day of Democracy : 15 सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाही ही केवळ एक शासनपद्धती नाही, तर ती प्रत्येक व्यक्तीला समान हक्क देणारी, स्वातंत्र्याची अनुभूती देणारी आणि न्यायाची हमी देणारी जीवनशैली आहे. या खास दिवशी जगभरात लोकशाहीच्या मूल्यांवर चर्चा, कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जातात.
“जनतेसाठी, जनतेद्वारे आणि जनतेच्याच” या संकल्पनेवर लोकशाहीची उभारणी झाली आहे. याचा अर्थ, सत्ता एका व्यक्तीकडे किंवा राजाकडे नसून ती थेट जनतेच्या हातात असते. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, जिथे अब्जावधी लोक आपल्या मतदानाच्या अधिकाराद्वारे स्वतःचे सरकार निवडतात. लोकशाहीचे मूळ तत्व म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य, समानतेचा अधिकार आणि न्यायाची हमी. राजाशाही, गुलामगिरी किंवा अन्यायकारी सत्तेच्या पलीकडे जाऊन लोकशाही सर्वांना समानतेने सामावून घेते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभेच्या २००७ च्या ठरावातून झाली. ८ नोव्हेंबर २००७ रोजी महासभेने हा ठराव पारित केला आणि २००८ पासून दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. यामागील प्रेरणा १९९७ मध्ये आंतरसंसदीय संघाने (Inter-Parliamentary Union – IPU) स्वीकारलेल्या “लोकशाहीच्या सार्वत्रिक घोषणे”तून आली होती. या घोषणेनं जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांना एक समान चौकट दिली आणि लोकशाही मूल्यांची सार्वत्रिक जपणूक करण्याचे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुख्य हेतू म्हणजे लोकशाहीबद्दल जागरूकता वाढवणे. आजच्या काळात काही ठिकाणी लोकशाही मूल्यांवर गदा येताना दिसते काही सत्ताधारी गट लोकशाही मर्यादा मोडू इच्छितात, तर काही ठिकाणी लोक स्वतः लोकशाहीकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत हा दिवस आपल्याला पुन्हा लोकशाहीच्या मूलभूत संकल्पनेची आठवण करून देतो. संयुक्त राष्ट्र महासभेने स्पष्ट केले आहे की लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक प्रक्रिया नाही, तर त्यात मानवी हक्कांचे रक्षण, कायद्याचे राज्य आणि सुशासन यांचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्तीला राजकीय आणि सामाजिक जीवनात अर्थपूर्ण सहभाग मिळणे हे लोकशाहीचे खरे यश आहे.
Indian Railways observes #InternationalDayofDemocracy, reaffirming the fundamental values of freedom, equality and civic participation in shaping a democratic nation. pic.twitter.com/KU9MPm0dRJ
— Ministry of Railways (@RailMinIndia) September 15, 2025
credit : social media
भारतातील लोकशाही ही जगासाठी प्रेरणादायी आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताने विविधता, बहुभाषिकता, अनेक धर्म आणि संस्कृती यांना सामावून घेऊन एक आदर्श उभा केला आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. लोकशाही ही फक्त मतदानापुरती मर्यादित नसून ती दैनंदिन जीवनातील मूल्यांमध्येही दिसली पाहिजे जसे की सहिष्णुता, एकमेकांचा सन्मान, विचारांची देवाण-घेवाण आणि जबाबदारीने वागणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेनचा थेट रशियाच्या अर्थव्यवस्थेवरच घाला; Russia मध्ये अचानक पेट्रोलचा तुटवडा, वाचा का ते?
दरवर्षी १५ सप्टेंबरला शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, तसेच विविध सरकारे या दिवशी वादविवाद, परिसंवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करतात. यातून तरुण पिढीला लोकशाहीचे महत्त्व समजते आणि नागरिकांमध्ये सक्रिय सहभागाची प्रेरणा निर्माण होते. लोकशाही ही केवळ राजकीय संकल्पना नसून ती मानवी जीवनाचे मार्गदर्शन करणारी जीवनशैली आहे. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आपल्याला हेच स्मरण करून देतो की प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे, प्रत्येक मताला किंमत आहे आणि प्रत्येक नागरिक लोकशाहीच्या प्रवासाचा समान भागीदार आहे.