AI careers : बारावीनंतर लगेच निवडा 'AI' करिअर; 'हे' आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बारावीनंतर एआय (Artificial Intelligence) क्षेत्रातील कोर्सेसमुळे चांगल्या करिअरच्या आणि परदेशातील नोकरीच्या संधी वाढतात.
बी.टेक, बी.कॉम, बीसीए, तसेच अल्पकालीन डिप्लोमा कोर्सेसद्वारे विद्यार्थी एआयचे सखोल शिक्षण घेऊ शकतात.
एआय कोर्सेसमुळे डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रांमध्येही प्रगतीची दारे खुली होतात.
Courses for AI jobs abroad : आजच्या स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांसाठी करिअरचा मार्ग निवडणे हा एक मोठा टप्पा ठरतो. बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा, भविष्यात नोकरी कुठे मिळेल, करिअरमध्ये स्थैर्य किती असेल अशा असंख्य प्रश्नांमुळे पालक व विद्यार्थी दोघेही गोंधळतात. परंतु आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). तंत्रज्ञानाच्या प्रत्येक अंगामध्ये एआयचा वापर वाढत असून, त्यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या संधी अमर्याद आहेत.
आज माहिती शोधणे, संवाद साधणे, बँकिंग, आरोग्य, शिक्षण, अगदी मनोरंजनपर्यंत प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर सुरू आहे. एआय टूल्सनी उद्योगांच्या कामकाजात क्रांती केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात कौशल्य मिळवले तर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातूनही नोकरीचे कॉल आणि शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध होतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेनचा थेट रशियाच्या अर्थव्यवस्थेवरच घाला; Russia मध्ये अचानक पेट्रोलचा तुटवडा, वाचा का ते?
बी.टेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय.
हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून प्रवेशासाठी पीसीएम (Physics, Chemistry, Maths) विषय आवश्यक.
यात मशीन लर्निंग, रोबोटिक्स, डेटा सायन्स यांसारख्या विषयांचे सखोल शिक्षण दिले जाते.
बी.कॉम (एआयसह)
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी.
यामध्ये फायनान्स, अकाउंटिंगसोबत एआय टूल्सचा वापर, डेटा ॲनालिटिक्स, ऑटोमेशन, रिपोर्टिंग यांसारखी कौशल्ये शिकवली जातात.
उदाहरणार्थ, मुंबईतील युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स उपलब्ध असून तो तीन वर्षांचा असतो. प्रवेशासाठी बारावीमध्ये किमान ५०% गुण आवश्यक.
बीसीए (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)
संगणक आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय उत्तम.
या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात एआय प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग, डेटा मायनिंग अशा विषयांचा समावेश आहे.
प्रवेशासाठी गणित विषय अनिवार्य आहे.
डिप्लोमा कोर्सेस इन एआय
कमी वेळेत एआय शिकू इच्छिणाऱ्यांसाठी सोयीस्कर.
कालावधी ६ महिने ते १ वर्ष.
यात ChatGPT, Prompt Engineering, विविध एआय टूल्सचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाते.
हे कोर्सेस पदवीसोबत साइडमध्येही करता येतात.
एआय शिकल्याने केवळ नोकरीच्या संधी वाढत नाहीत, तर स्टार्टअप आयडियाज, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांतही विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आकर्षक पॅकेज मिळवण्याची संधी.
शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशी शिक्षणाची दारे खुली.
तंत्रज्ञान क्षेत्रात टिकाव धरण्यासाठी एआयचे ज्ञान अनिवार्य ठरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peñico city discovery : अमेरिकन संस्कृतीच्या उगमाचे रहस्य उलगडले; पेरूमध्ये सापडलेले 3800 वर्ष जुने शहर
बारावीनंतर कोणता करिअर मार्ग निवडावा, हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. आजच्या काळात एआय हे फक्त भविष्य नाही, तर वर्तमान आहे. त्यामुळे बी.टेक, बी.कॉम, बीसीए किंवा डिप्लोमा कोणताही मार्ग निवडा, परंतु एआय कौशल्य आत्मसात करा. हे कौशल्य तुम्हाला चांगल्या करिअरकडे, परदेशातील संधींकडे आणि उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल.