चेन्नई सुपर किंग्जचा IPL 2024 मधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध आहे. हा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. त्यापैकी एक रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचला होता. डेव्हन कॉनवे, मुस्तफिजुर रहमान आणि मथिशा पाथिराना या खेळाडूंना दुखापत झाली आहे.
आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात धोनीचा संघ CSK RCBशी भिडणार आहे. सीएसकेचे तीन खेळाडू आतापर्यंत जखमी झाले आहेत. यामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. डेव्हॉन कॉनवे संघाचा एक मजबूत भाग आहे. गेल्या मोसमात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती.
मथिशा पाथिराना (श्रीलंका) –
वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला CSK ने 2022 मध्ये विकत घेतले. यानंतर त्याला 2023 मध्ये कायम ठेवण्यात आले. पाथीरानाने गेल्या मोसमात 12 सामन्यात 19 विकेट घेतल्या होत्या. पाथीरानाने 2022 मध्ये फक्त 2 सामने खेळले. या कालावधीत 2 बळी घेतले. मात्र या मोसमात खेळणे त्याच्यासाठी अवघड आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेदरम्यान पाथिरानाला दुखापत झाली होती.
डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड) –
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवेला CSK ने 1 कोटी रुपयांना विकत घेतले. तो २०२२ पासून संघासोबत आहे. कॉनवेने 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याने 16 सामन्यात 672 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 6 अर्धशतके झळकावली. कॉनवेची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 92 होती. मात्र या मोसमात खेळणे त्याच्यासाठी अवघड आहे. कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती.
मुस्तफिजुर रहमान (बांग्लादेश) –
बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने अनेक वेळा शानदार गोलंदाजी केली आहे. सीएसकेने त्याला 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. मुस्तफिझूरला आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणे कठीण आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग 2024 दरम्यान तो जखमी झाला होता. मुस्तफिजूर इतका गंभीर जखमी झाला होता की, त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात न्यावे लागले.