आशिया कपचे वेळापत्रक जाहीर (फोटो- ai gemini)
ऑगस्ट अखेरपासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. सर्व सामने युएईमधील मैदानांवर खेळवले जातील. आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे.
महिला आशिया कप 2026 स्पर्धेत एकूण 8 संघ खेळणार आहेत. 8 संघांना दोन ग्रुप्समध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ असणार आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पहिले दोन संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करणार आहेत. भारताचा संघ ए ग्रुपमध्ये असणार आहे. ज्यामध्ये थायलंड आणि हाँगकाँग आणि पाकिस्तान संघांचा समावेश असणार आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये श्रीलंका, बांग्लादेश, यूएई आणि इंडोनेशिया या संघाचा समावेश असणार आहे. भारतीय निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तर धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
India will begin their Women’s Asia Cup 2026 campaign against Thailand, followed by Hong Kong and Pakistan to conclude Group A. The top two teams from each group advance to the semis before the grand finale. All games will be held in Dubai.#WomensAsiaCup pic.twitter.com/UIvRCb9GGm — Circle of Cricket (@circleofcricket) August 6, 2026
काय आहे भारतीय संघाचे वेळापत्रक?
भारत-विरुद्ध थायलंड – 28 ऑगस्ट 2026
भारत विरुद्ध हाँगकाँग – 3 सप्टेंबर 2026
भारत विरुद्ध पाकिस्तान – 5 सप्टेंबर 2026
वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर
भारतीय महिला संघ: कर्णधार: हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, ऋचा घोष, जी. कमलिनी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह, क्रांती गौड, एन. श्री चरणी, नंदनी शर्मा.






