हा 'ड्रॉ' आमच्यासाठी विजयासारखाच, Afghanistan च्या कर्णधाराकडून सेदिकुल्लाह अटलचे कौतुक, सौजन्य : आयएएनएस
अफगाणिस्तान (Afghanistan)आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील शेख जायद स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला एकमेव टेस्ट सामना हा ड्रॉ राहिला. पहिल्या डावातील पिछाडीनंतर अफगाणिस्तानने ज्याप्रकारे हा सामना ड्रॉ केला, ते पाहता जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे त्यांनी मनं जिंकले आहे. अशात अफगाणिस्तानचा कर्णधार रहमत शाहने देखील यावर आनंद व्यक्त केला असून हा ड्रॉ एकप्रकारे आमच्यासाठी विजयासारखाच असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.
रहमत शाहने दुसऱ्या डावात शतक ठोकत टेस्ट ड्रॉ करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारा फलंदाज सेदिकुल्लाह अटलचे कौतुक केले.
प्रेझेंटेशन सेरेमनीत रहमत म्हणाला की, सेदिकुल्लाह नुकतेच टी-20 खेळून आला होता. ज्याप्रकारे त्याने धैर्य दाखवले, संघाला जे हवे होते, ते पूर्ण केले, त्यामुळे आम्ही या ध्येयापर्यंत पोहचू शकलो. तो पुढे म्हणाला की, एका संघाच्या रुपात मला आनंद आहे की, सामन्यात दोन खेळाडूंनी शतक झळकावले. काहींनी अर्धशतक ठोकले व गरजेच्या भागीदारीत योगदान दिले.
खालच्या क्रमांकावरील फलंदाजीने समजुतदारपणे फलंदाजी केली. आमचा प्लान खूप वेळेपर्यंत बॅटिंग करायचा होता. संयम राखायचे होते. डॉट बॉल जावो किंवा मेडन ओव्हर त्याबाबत आम्हाला त्रस्त व्हायचे नव्हते.
आमचे लक्ष्य संपूर्ण दिवस फलंदाजी करायचे होते. दुसऱ्या डावात 142 षटक आणि सात तासांपेक्षा जास्त फलंदाजी करणे आमच्यासाठी एक मोठे यश होते. सर्वांचा प्रयत्न खूपच छान असल्याचे सेदिकुल्लाह म्हणाला.
IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानचे प्रशिक्षक रिचर्ड पायबस म्हणाले की, खरं तर सामन्याचा निकाल बदलण्याचे श्रेय सेदिकुल्लाहला जाते. ही त्याच्यासाठी एक शानदार खेळी होती. तो थोडा आउट ऑफ टच होता, त्यामुळे त्याने या खेळीत खूप मेहनत घेतली. त्याला याचे श्रेय जाते. तो आपल्या कसोटी करिअरच्या सुरुवातीच्या काळात आहे. तो हा आत्मविश्वास पुढे घेऊन जाईल.
सामन्याचा विचार करता, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 346 धावा केल्या. अफगाणिस्तान पहिल्या डावात 240 धावाच करू शकला. पहिल्या डावात कर्णधार रहमत शाहने नाबाद 105 धावा केल्या. तर बांगलादेशने दुसऱ्या डावात 7 बाद 372 धावांवर आपला डाव घोषित केले. अशाप्रकारे अफगाणिस्तानला विजयासाठी 479 धावांचे लक्ष्य दिले.
अफगाणिस्तानची सुरुवात खराब राहिली. अब्दुल मलिक 2 धावांवर बाद झाला. दुसरा ओपनर सेदिकुल्लाह अटलने त्यानंतर डाव सावरला. अटलने 332 चेंडूंचा सामना करताना 111 धावांची खेळी करत सामना ड्रॉ करण्याच महत्त्वाची भूमिका बजावली.
आज Gautam Gambhir ‘भाई’ का बर्थडे, सेलिब्रेशन तर होणारच; ‘GG’ वर शुभेच्छांचा वर्षाव..!
अटलला कर्णधार रहमत शाह (124 चेंडूंत 51 धावा), हशमतुल्लाह शाहिदी (69 चेंडूंत 36 धावा), इक्राम अलीखिल (69 चेंडूंत 33 धावा), यामिन अहमदजई (85 चेंडूंत 19 धावा) आणि कॅस अहमद 80 चेंडूंत नाबाद 49 धावा) यांनी चांगली साथ दिली.
अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात 142 षटक फलंदाजी करत 8 बाद 346 धावा केल्या. अशाप्रकारे या धावसंख्येवर पाचव्या दिवसाचा खेळ समाप्त करण्यात आला आणि सामना ड्रॉ घोषित केला गेला.






