फोटो सौजन्य - Shubhankar Mishra युट्युब
विराट कोहली – अमित मिश्रा : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज आणि भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच्या त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत असतो. त्याचबरोबर तो त्याच्या खासगी जीवनामुळे सुद्धा बऱ्याच वेळा चर्चेत पाहायला मिळतो. विराट कोहलीचे चाहते त्याचबरोबर त्याला खेळताना पाहणारे जगभरामध्ये आहेत. नुकतीच एक मुलाखत प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या टीममेटनेच त्याच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्याने सांगितले की, प्रसिद्धी आणि शक्तीने विराट कोहलीला बदलले आहे. त्याचबरोबर त्याने रोहित शर्माबद्दल देखील वक्तव्य केले आहे.
भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने (Amit Mishra) प्रसिद्ध पत्रकार शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक त्याच्या माजी खेळाडूंवर वक्तव्य केले आहे. शुभंकर मिश्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये अमित मिश्रा म्हणाला की, प्रत्येकजण इतका प्रामाणिक नसतो. एक क्रिकेटर म्हणून मी त्याचा खूप आदर करतो, पण मी त्याच्यासोबत पूर्वीसारखे नाते शेअर करत नाही. विराटचे मित्र कमी का आहेत? त्याचा आणि रोहितचा स्वभाव आहे. आताही जेव्हा मी रोहित शर्माला इतर कोणत्याही कार्यक्रमात भेटतो तेव्हा तो काय विचार करेल याचा मला विचार करण्याची गरज नाही असे अमित मिश्रा म्हणाला. त्याचबरोबर त्याने रोहित शर्माबद्दल म्हणाला की, रोहित शर्मा अजूनही जवळपास तसाच आहे.
माजी फिरकीपटूला विचारण्यात आले होते की, कोहली बदलला आहे का? याला उत्तर देताना अमित मिश्रा म्हणाले, “विराट खूप बदलला आहे हे माझ्या लक्षात आले आहे. आम्ही बोलणे जवळजवळ बंद केले आहे. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी आणि सत्ता मिळते, तेव्हा काही लोकांना वाटते की इतर काही हेतूने त्यांच्याकडे येतात.” असा मोठा खुलासा त्याने केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.