दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या अर्जंटिनाने २० नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत ३५ वर्षीय लिओनेल मेस्सी अर्जेंटिना फुटबॉल संघाचं नेतृत्व करणार आहे. ही त्याची पाचवी विश्वचषक स्पर्धाअसून मेस्सीसह, एंजल डी मारिया आणि निकोलस ओटामेंडीसारख्या दिग्गज खेळाडूंसाठीही हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. संघात निवडलेले सर्व खेळाडू दिग्गज युरोपियन फुटबॉल क्लबचा भाग आहेत.
अर्जेंटिनानं शेवटचा विश्वचषक १९७८ मध्ये जिंकला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी पश्चिम जर्मनीला पराभवाची धुळ चारली होती. तेव्हापासून म्हणजेच ४४ वर्षांपासून अर्जेंटिनाच्या संघाला विश्वचषक जिंकता आला नाही. दरम्यान, दोनदा अर्जेंटिनाचा संघ विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहचला होता. मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. फिफा २०२२ विश्वचषकात अर्जेंटिनाच्या संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलाय. अर्जेंटिना व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये साऊदी अरब, मॅक्सिको, पोलँड हे देश देखील आहेत. अर्जेंटिना २२ नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.
#Qatar2022 Nuestro entrenador @lioscaloni dio a conocer la nómina de jugadores que nos representarán en esta nueva edición de la @FIFAWorldCup.
¡Con ustedes los elegidos! ?????#TodosJuntos ?? pic.twitter.com/qUeY2uygVv
— Selección Argentina ?? (@Argentina) November 11, 2022
अर्जेंटिनाचा संपूर्ण संघ :