फोटो सौजन्य - ICC
एडन मार्कराम : दक्षिण आफ्रिकेने (South Africa vs Afghanistan) उपांत्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. त्यांनी उपांत्य फेरीमध्ये अफगाणिस्तानच्या संघाला अवघ्या ५६ धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ९ विकेट्स राखून ६७ बॉल शिल्लक असताना पराभव केला. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करामचा (South Africa Captain Aiden Markram) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संघाच्या विजयानंतर कर्णधार एडन मार्कराम भावूक होताना दिसला.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम अफगाणिस्तानला ५६ धावांत गुंडाळले आणि नंतर ८.५ षटकांत १ गडी गमावून सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा एक मजबूत संघ आहे. त्यांच्या क्रिकेट चर्चा ही जगभरामध्ये केली जाते. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर चोकर्सचा टॅग होता. पण एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि ते विश्वचषकामध्ये अपराजित राहिले आहेत. संघाच्या विजयानंतर मार्कराम भावूक झाला आणि त्याचे डोळ्यातून अश्रू अनावर झाले. मार्करामचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत नेणारा मार्कराम हा पहिला कर्णधार आहे.
From tears in Eden to happiness in Trinidad in a World Cup Semi-Final.
– MARKRAM HAS DONE IT…!!!! 💪 pic.twitter.com/OB3KDAnCY6
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2024
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यामध्ये राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांचा हा प्लॅन फ्लॉप ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघाने अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत ५६ धावांवर ऑल आऊट केले. दुर्दैव म्हणजेच अफगाणिस्तानच्या संघाने एकानेही १० वर धावा केल्या नाहीत. अजमतुल्ला उमरझाई फक्त १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ५६ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९ षटक पूर्ण होण्याच्या आधीच पूर्ण केले. आम्ही तुम्हाला सांगतो की क्विंटन डी कॉकने २०२४ T-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ८ सामन्यात २०४ धावा केल्या आहेत. डी कॉकने या स्पर्धेत १७ चौकार आणि १२ षटकार मारले आहेत. संघाकडून एनरिक नॉर्खियाने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने ८ सामन्यात १३ विकेट घेतल्या आहेत.