Asia cup 2025: Liton Das creates history! Breaks Shakib Al Hasan's record; does 'this' feat in T20
Liton Das breaks Shakib Al Hasan’s record : आशिया कप २०२५ मध्ये काल बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सुपर फोरमधील पहिला सामना खेळवण्यात आला. या रोमांचकारी सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात बांगलादेशच्या टी२० कर्णधार लिटन दासने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने टी२० मध्ये शाकिब अल हसनचा विक्रम मोडीत कडून इतिहास रचला आहे. लिटन दास आता बांगलादेशचा टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने शाकिब अल हसनचा २५५१ धावांचा विक्रम मागे टाकून या फॉरमॅटमध्ये आपल्या देशाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. दुबईमध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यामध्ये शाकिबला मागे टाकण्यासाठी लिटन दासला १९ धावांची गरज होती, तेव्हा लिटनने १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजीला उतरल्यावर १६ चेंडूत २३ धावा करून ही कामगिरी साध्य केली आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तानला झटका! IND vs PAK सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्टच सामनाधिकारी;आयसीसीची ताठर भूमिका
बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनने त्याच्या १८ वर्षांच्या टी२० कारकिर्दीमध्ये १२९ सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने २५५१ धावा फटकावल्या आहेत. दरम्यान, लिटन दासने त्याच्या ११४ व्या सामन्यातच हा पराक्रम केला आहे. त्याने टी२० मध्ये १५ वेळा ५० धावांचा टप्पा पार केला आहे आणि या फॉरमॅटमध्ये बांगलादेशसाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे.
बांगलादेशसाठी सामन्याच्या पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना मुस्तफिजूर रहमानने शाकिबच्या टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. शाकिबने १२९ सामन्यांमध्ये १४९ विकेट्स काढल्या आहेत. तर रहमानने ११७ सामन्यांमध्ये १४९ विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. या सामन्यात मुस्तफिजूरने ४ षटकांत २० धावा देत ३ बळी टिपल्या.
शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुस्तफिजूर रहमानने शानदार गोलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने आपल्या कामगिरीत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने १४ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कुसल परेराची विकेट काढून आपले खाते उघडले.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तान संघ भारतीय भिंत भेदणार? तयार केला खास ‘मास्टरप्लॅन’; महामुकाबल्याची वाढली रंगत
रहमानने त्याच्या शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कामिंदू मेंडिसला माघारी पाठवले. मेंडिसने दोन चेंडूत फक्त एक धाव काढली आणि लिटन दासने पुन्हा एकदा रहमानला यश मिळवून देण्यात यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर वानिंदू हसरंगा षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा नादात सीमारेषेजवळ तंजीद हसननला झेल देऊन बसला.