भारत वि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये (Asia cup 2025)आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोरमधील एक महामुकाबला होणार आहे. संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष्य या सामन्याकडे लागून आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दूसरा सामना होणार आहे. पहिल्या गट सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तानसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. वास्तविक पाहता हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. यामध्ये आता पाकिस्तान संघ पहिल्या सामन्यात पत्करावा लागलेल्या पराभवाचा बदला काढण्यासाठी उत्सुक असणार आहे. भारताला पराभूत करून विजय मिळवण्यासाठी पाकिस्तान संघ आता एका मास्टरप्लॅनसह तयार झाला आहे.
आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भारतीय संघापुढे पाकिस्तान संघ खूपच कमकुवत असताना पाकिस्तान इतका मोठा आत्मविश्वास कसा दाखवत आहे. परंतु, पाकिस्तान संघ आता एका भव्य योजनेवर काम करत आहेत. २१ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानने एक मास्टरप्लानची आखणी केली आहे. यामध्ये एका प्रेरणदायी वक्त्याचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘पाकिस्तानी संघ लोकल संघासारखा…’, भारताच्या माजी दिग्गज खेळाडूचे खणखणीत ताशेरे
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघातिल खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी एका प्रेरक वक्त्याला आमंत्रित केले आहे. राहिल करीम असे या वक्त्याचे नाव आहे. या वक्त्याचे काम आता संघासोबत राहणे आणि सर्व खेळाडूंना मानसिकदृष्ट्या बळकट करणे असणार आहे. राहिल रविवारी पाकिस्तान संघात सामील झाला आहे. तो आता स्पर्धेच्या शेवटपर्यंत संघासोबत राहणार अस्लयची माहिती मिळत आहे.
राहिल गेल्या काही काळापासून खेळासाठी मानसिक दृष्ट्या बळकटी निर्माण करण्याचे काम बघत आहे. पाकिस्तान संघ सध्या अत्यंत वाईट स्थितिउण मार्गक्रमण करत आहे. भारताकडून पराभव स्वीकारणे हे एक युद्ध हरण्यासारखेच आहे. त्यामुळे, पाकिस्तानी संघ एका प्रेरक वक्त्याच्या मदतीने मानसिकदृष्ट्या स्वतःला बळकट करण्याची तयारी करत असल्याचे समजते.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तानला झटका! IND vs PAK सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्टच सामनाधिकारी;आयसीसीची ताठर भूमिका
१४ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकतर्फी ७ विकेट्सने धुव्वा उडवला होता. मागील सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाकडून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु तो टीम इंडियाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. भारतासमोर पाकिस्तान संघाने नाममात्र १२८ धावांचे आव्हान दिले होते जए भारताने ३ विकेट्स गमावून पूर्ण केले होते.