Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य

Kumkum mohod & Dhiraj won Silver in Archery Recurve: भारतीय तिरंदाज धीरज बोम्मादेवरा आणि कुमकुम मोहोड यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात प्रथमच रौप्यपदक जिंकले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 02:16 PM
Kumkum mohod & Dhiraj won Silver in Archery

Kumkum mohod & Dhiraj won Silver in Archery

Follow Us
Follow Us:
  • भारताचा ऐतिहासिक विजय
  • धीरज-कुमकुमच्या जोडीने जिंकले रौप्यपदक
  • भारताला आर्चरी रिकर्व्हमध्ये पहिले रौप्य
भारतीय तिरंदाज धीरज बोम्मादेवरा आणि कुमकुम अनिल मोहोड यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2026) मिश्र रिकर्व्ह प्रकारात इतिहास रचला. धीरज आणि कुमकमच्या जोडीने अंतिम फेरीत रौप्य पदकावर नाव कोरले. सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताला चीनकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत २०१८ पासून मिश्र रिकर्व्ह प्रकार खेळवला जात आहे. यापूर्वी २०१८ च्या जकार्ता-पालेमबांग आणि २०२२ च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला या प्रकारात पदक जिंकण्यात अपयश आले होते. त्यामुळे, धीरज आणि कुमकुम यांचे रौप्य पदक हे या प्रकारातील भारताचे पहिले आशियाई क्रीडा पदक आहे.

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

गोल्ड हुकले पण इतिहास रचला

तिरंदाजीच्या मिश्र रिकर्व्ह प्रकारात, कुमकुम आणि धीरज चीनविरुद्धच्या पहिल्या दोन सेटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. यात चिनी जोडीने पहिला सेट ३८-३७ असा जिंकून २-० अशी आघाडी घेतली, त्यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले, परंतु सामना ३७-३७ असा बरोबरीत सुटल्याने चिनी जोडी सामन्यात २-० ने पुढे राहिली. चिनी जोडीने पुन्हा तिसरा सेट ३७-३६ अशा फरकाने जिंकून २ गुण मिळवले आणि चौथा सेटही ३७-३७ असा बरोबरीत सुटताच, भारतीय जोडीला ५-३ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

कुमकुमने महिला सांघिक रिकर्व्ह स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

रिकर्व्ह मिश्र प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी १७ वर्षीय भारतीय तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड हिने शानदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. याच दिवसाच्या सुरुवातीला महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारातही सुवर्णपदक जिंकले तिने होते, जिथे भारतीय महिला संघाचा सामना ऑलिम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाशी झाला होता.

मिश्र रिकर्व्ह स्पर्धा २०१८ पासून आयोजित

२०१८ च्या जकार्ता-पालेमबांग येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र रिकर्व्ह स्पर्धेचा समावेश करण्यात आला. पहिल्या स्पर्धेत जपानने सुवर्ण, उत्तर कोरियाने रौप्य आणि चीनने कांस्यपदक जिंकले. २०२२ च्या हांगझू येथे दक्षिण कोरियाने सुवर्ण, जपानने रौप्य आणि इंडोनेशियाने कांस्यपदक जिंकले. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनने सुवर्ण आणि भारताने रौप्यपदक जिंकले. अशाप्रकारे, भारताने या स्पर्धेत प्रथमच पदक पटकावले. या रौप्य पदकासह, आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमधील भारताच्या एकूण पदकांची संख्या सहा झाली आहे. यामध्ये चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे.

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड

Web Title: Asian games 2026 kumkum mohod dhiraj bommadevara archery recurve silver medal pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • archery
  • asian games 2026
  • Silver Medal

संबंधित बातम्या

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड
1

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक
2

Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल
3

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास
4

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.