Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs BNG : बांगलादेशच्या कर्णधाराचा शतकी तडाखा! Nazmul Hasan Shanto ने श्रीलंकेला झुलवले, पहिल्यांदाच केला ‘हा’ भीम पराक्रम.. 

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. या शतकाने त्याने आपल्या संघाला सुस्थितीत पोहचवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 17, 2025 | 08:33 PM
SL vs BNG: Bangladesh captain hits century! Nazmul Hasan Shanto crushes Sri Lanka, performs 'this' Bhim feat for the first time..

SL vs BNG: Bangladesh captain hits century! Nazmul Hasan Shanto crushes Sri Lanka, performs 'this' Bhim feat for the first time..

Follow Us
Close
Follow Us:

Nazmul Hasan Shanto’s century for Sri Lanka : बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची धडाक्यात सुरवात केली आहे. त्याने गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. यासोबतच त्याने शतकाच्या जोरावर आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आहे आणि संघाला संकटातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. ४५ धावांत तीन विकेट गमावल्यानंतर बांगलादेशचा संघ संघर्ष करताना दिसून आला. अशा परिस्थित त्याने मुशफिकर रहीमसोबत संघचा डाव सावरला. रहीमने देखील शतक लगावले आहे.  बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने २०२ चेंडूचा सामना करत ११ चौकार आणि १ षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्ध हे त्याचे दुसरे शतक ठरले आहे, तर परदेशी भूमीवरील हे त्याचे तिसरे शतक आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : विराट-धोनीसह ‘या’ दिग्गजांचे विक्रम धोक्यात! इंग्लंड मालिकेत शुभमन गिल करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी..

कठीण परिस्थित संघाला सावरले..

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेका मंगळवार, १७ जून रोजी गॉल मैदानावर सुरवात झाली.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ देखील या सामन्याने सुरू झाली आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु काही काळासाठी त्याचा निर्णय अयोग्य असल्याचे दिसून आले, जेव्हा बांगलादेशला पहिला धक्का ५ धावांवर बसला.

एकेकाळी तर बांगलादेश केवळ  ४५ धावांवर तीन विकेट गमावून बसला होता. त्यानंतर शांतो आणि यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम यांनी जबाबदारी सांभाळत हळूहळू डाव पुढे नेला. या दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या दोनशेच्या पुढे नेली. दरम्यान, शांतोने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक देखील पूर्ण केले. त्यानंतर मुशफिकुर रहीमने देखील १८६ चेंडूचा सामना करत १०५ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शांतो १३६ वर तर आणि यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम १०५ वर नाबाद होते.

हेही वाचा : “तू तुझ्या देशाचा खरा सेवक..”, Angelo Mathews च्या निवृत्तीवर भारताच्या माजी कसोटी कर्णधाराची भावुक संदेश; पाहा Video

 शांतोचे श्रीलंकेविरुद्ध दुसरे शतक

शांतोने श्रीलंकेविरुद्ध त्याच्याच भूमीवर हे त्याचे दुसरे शतक ठरले आहे, तर त्याने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध एक शतक झळकावले होते.  तर शांतोने घरच्या मैदानावर तीन शतके झळकावली आहेत. यापैकी दोन अफगाणिस्तानविरुद्ध तर एक न्यूझीलंडविरुद्ध आले आहे.  बांगलादेशी कर्णधाराने २०२१ मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध १६३ धावांची खेळी साकारली होती. जी त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या सामन्यापूर्वी, शांतोने ३५ कसोटी सामन्यांमध्ये २९.०६ च्या सरासरीने १८८९ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. बांगलादेशने पहिल्या दिवसाअखेर ३ गडी गमावून  २९२ धावा केल्या आहेत.

Web Title: Bangladesh captain nazmul hasan shanto scored a century against sri lanka performing a heroic feat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 08:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.