शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया परदेश दौऱ्यावर आहे. त्यामुळे शुभमन गिलला कसोटीत टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे. याशिवाय अनेक तरुण खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
अशा परिस्थितीत कर्णधार शुभमन गिलला संघासोबत स्वतःसाठी देखील चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे एक खास विक्रम रचण्याची संधी असणार आहे. इंग्लंड मालिकेत त्याला राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकण्याची नामी संधी असणार आहे.
शुभमन गिल ‘या’ भारतीय खेळाडूंना टाकणार मागे..
शुभमन गिलने जर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन सामने आपल्या नावावर केले तर तो कर्णधार म्हणून अजित वाडेकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांच्या पुढे निघून जाईल. जर त्याने या काळात तीन सामने जिंकले तर तो विराट कोहलीच्या पुढे जाईल. अशा परिस्थितीत, तो त्याच्या पहिल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची बरोबरी साधणार आहे. त्याच वेळी, जर त्याने मालिकेत चार कसोटी जिंकल्या तर तो कर्णधारपदाच्या बाबतीत विराट कोहलीला देखील मागे सोडणार आहे.
कर्णधार म्हणून, विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक कसोटी सामने जिंकून दाखवले आहेत. त्याने इंग्लंडमध्ये तीन सामने जिंकले आहेत. यानंतर, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने २ कसोटी सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, राहुल द्रविड, एमएस धोनी, सौरव गांगुली आणि अजित वाडेकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली १-१ कसोटी सामन्यावर आपले नाव कोरले आहे. अशा परिस्थितीत, शुभमन गिलला या दिग्गजांना मागे टाकण्याची नामी संधी चालून आली आहे.