
Bangladesh vs Ireland: Liton Das hits century! Creates three records; Makes royal entry into the club of legends
मीरपूरमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसह, लिटन दासने त्याचे पाचवे कसोटी शतक देखील पूर्ण केले. या शतकासह, तो बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा संयुक्त सहावा फलंदाज ठरला आहे. मोमिनुल हक आणि मुशफिकुर रहीम हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज असून ज्यांनी बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी १३ शतके ठोकली आहेत.
मीरपूरमध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या लिटन दासने कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या अहते. २०१५ पासून ते हे लिहिण्याच्या वेळेपर्यंत, त्याने बांगलादेशकडून ५२ कसोटी सामने खेळलेले आहेत. त्याने ९० डावांमध्ये ३५.४२ च्या सरासरीने ३११७ धावा फटकावल्या आहेत. लिटन दास तो बांगलादेशचा कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
मीरपूरमध्ये मुशफिकुर रहीम आणि लिटन दास यांच्यात शतकी भागीदारी झाली. ही भागीदारी कसोटी क्रिकेटमधील त्यांची सातवी शतकी भागीदारी ठरली आहे. ही जोडी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी पहिली बांगलादेशी जोडी ठरली आहे.
मुशफिकुर रहीम आणि लिटन दास यांच्याव्यतिरिक्त, हबीबुल बशर आणि जावेद उमर, मोमिनुल हक आणि मुशफिकुर रहीम आणि मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसन यांनी बांगलादेशसाठी ५ किंवा त्याहून अधिक धावांच्या शतकी भागीदारी रचल्या आहेत.