न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा (फोटो- सोशल मिडिया)
BCCI ने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध टी-20, वनडे आणि कसोटी सिरीज खेळणार आहे.पहिल्या तीन सामन्यात वनडे सामन्यात शुभमन गिल कर्णधार असणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करणार आहे.
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन मुकाबल्यांमध्ये युवा फलंदाज शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेवटच्या दोन वनडे सामन्यांमध्ये अचानक कर्णधारपद बदलण्यामागचे नेमके कारण काय आहे, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसेच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी देखील भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
🚨 News 🚨 #TeamIndia’s ODI and Test squads for New Zealand tour announced 📝 Captain Shubman Gill will lead the side for the first 3️⃣ ODIs, before Shreyas Iyer takes charge for the last 2️⃣ matches. More details ▶️ https://t.co/npwxUYlb1N #NZvIND https://t.co/3ckm7ixgEN — BCCI (@BCCI) October 16, 2026
भारताचा वनडे संघ: शुभमन गिल (कर्णधार),श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड़, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर,अंशुल कंबोज, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
शेवटच्या दोन वनडेसाठी भारताचा संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर, उपकप्तान), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, रुतुराज गायकवाड, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.
IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा,जसप्रीत बुमराह,ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, वॉशिंगटन सुंदर, आकाश दीप, अंशुल कंबोज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.






