भारत विरुद्ध न्यूझीलंड सिरीज (फोटो- सोशल मिडिया)
वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरिजनंतर भारतीय संघ आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज होत आहे. BCCI ने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टी20, वनडे आणि कसोटी सिरिज खेळवली जाणार आहे. सध्या बीसीसीआयने केवळ T20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी संघ लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या सिरिजची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होणार आहे. 22 तारखेला पहिला टी 20 सामना दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे.
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिंस यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव.
काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…
युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याला या संघात स्थान मिळाले आहे. तसेच नमन धीर, प्रिंस यादव आणि मयंक यादव यांसारख्या तरुण आणि वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक सामन्यांमध्ये संघात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे. मात्र निवड समिती आणि बीसीसीआयने त्याला स्टेडियम बाहेरच बसवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र या सिरिजमध्ये तरी त्याला खेळण्याची संधी देणार की पुन्हा त्याला बाहेरच बसवणार हे पहावे लागणार आहे.






