Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला महाराष्ट्राचा स्वाभीमान असल्याने….’; पॅरालिम्पिकपटू रौप्यपदक विजेता सचिन खिलारीला आली होती हरियाणामधून ऑफर

मला हरियाणामधूनसुद्धा खेळण्याची ऑफर आली होती, तसेच तगडे मानधन मिळणार होते तरीही महाराष्ट्राचा स्वाभीमान असल्याने येथूनच खेळण्याचा निर्णय घेतला. असा मोठा खुलासा पॅरिस पॅरालिम्पिकपटू सचिन खिलारीने पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या वार्तालापादरम्यान केला.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 19, 2024 | 10:02 PM
Paralympian Sachin Khilari revealed his Inspiring journey

Paralympian Sachin Khilari revealed his Inspiring journey

Follow Us
Close
Follow Us:

Paralympian Silver medalist Sachin Khilari Got an Offer from Haryana : मराठमोळ्या सचिन खिलारीला मोठ्या मानधनासह बक्षिसाची ऑफर आली होती. परंतु, मराठी बाणा दाखवत मी नम्रपणे ही ऑफर नाकारली. माझ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना याचा फायदा होईल. असा मोठा खुलासा रौप्यपदक विजेता सचिन खिलारीने केला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मी महाराष्ट्रासाठी मेडल आणू शकलो याचा मला अभिमान आहे., परंतु महाराष्ट्रात पॅरा खेळाडूंना इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी मानधन दिले जाते, अशी खदखद सचिन खिलारीने बोलून दाखवली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात पॅरिस पॅरालिम्पिकपटू सचिन खिलारीने आपली खंत आज व्यक्त केली.

आपल्या येथील खेळाडूंना अत्यंत कमी मानधन
इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या येथील खेळाडूंना अत्यंत कमी मानधन दिले जाते. उदाहरणार्थ पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलेल्या पॅरा अॅथलीट खेळाडूंना अवघे 30 लाख मानधन दिले जाते. तर इतर राज्यांमध्ये हेच मानधन 6 करोड रुपयांच्या घरात आहे. तसेच जे सदृढ खेळाडूंपेक्षासुद्धा पॅरा खेळाडूंना मानधन कमी आहे, अशी आपल्या मनातील खदखद रौप्यपदक विजेता पॅरालिम्पिकपटू सचिन खिलारीने बोलून दाखवली.

पॅरा ॲथलिट तथा रौप्यपदक विजेता सचिन खिलारी

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर पॅरा ॲथलिट तथा रौप्यपदक विजेता सचिन खिलारी आज त्याचा संपूर्ण इतिहास पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापप्रसंगी बोलून दाखवला. यावेळी त्याने आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. त्याने आपल्या बेजोड कामगिरीने महाराष्ट्राचे नाव वर केले.

वडिलांची इच्छा होती बीई मॅकनिकल बनायचे, घरातील आर्थिक परिस्थिती बेताची, सर्व भार अंगावर असे असताना कोणता मार्ग निवडावा, अशी संभ्रमावस्था असताना सचिन खिलारीला दिसले राजस्थानचे देवेंद्र झाझडिया आणि 3 इडियट्स पाहून स्वतःच्या निर्णायाला आणखीनच बळकटी आली. खेळाला प्रोत्साहन मिळाले अन् पुढे जे झाले ते सर्व जगाने पाहिले, पॅरालिम्पिकपटू सचिन खिलारीने मांडला यशाचा आलेख

मांडला यशाचा आलेख

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करीत रौप्यपदकाला गवसणी घालणाऱ्या सचिन खिलारी आज पत्रकारसंघात वार्तालापदरम्यान त्याच्या यशाचा आलेख मांडला. सचिन खिलारीने त्याच्या सुरुवातीपासून ते थेट रौप्यपदकाला गवसणी घालणारा इतिहास आज पत्रकारसंघाच्या वार्तालापादरम्यान मांडला.

सर्व सराव पुण्यातच
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण झालेला सचिन खिलारी याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी सर्व सराव पुण्यातच केल्याची कबुली दिली. सांगलीच्या करागणी तालुका आटपाडी येथील रहिवासी असलेल्या सचिनने अगदी ग्रामीण भागापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या सचिनने 11 वीला बारामती येथे प्रवेश घेतला. इयत्ता 12 वीला खेळाकडे लक्ष दिल्याने मार्क्स कमी पडल्याने वडिलांनी खेळापासून दूर जाण्यासा सांगितले.

सिंहगड इन्स्टिट्यूटला घेतला होता प्रवेश

बीई मॅकेनिकल इंजिनिअर व्हायचे असा सज्जड दम भरत सिंहगड इन्स्टिट्यूटला त्याने प्रवेश घेतला. सचिनने इंजिनिअरचे लक्ष ठेवून मार्गक्रमण सुरू केले, अन् बीई मॅकनिकलचा डिप्लोमा पास झाला. परंतु खेळाची आस काही सुटत नव्हती अन् एकदा देवेंद्र झाझडिया या दिव्यांग खेळाडूंचा पेपरमध्ये पाहिलेला फोटो पाहून आपणही त्यांच्यासारखे बनायचे असा चंग बांधला. त्याच्या या निश्चयाला 3 इडियट्स सिनेमाने अधिक बळकटी दिली.

या मेडलचा नोकरीसाठी झाला नाही उपयोग

सचिनने अश्वमेध स्पर्धेत पुणे विद्यापीठासाठी सुवर्णदेखील आणले आहे. आशियाई चॅम्पियनमध्येदेखील सचिनने गोळाफेकमध्ये सुवर्ण आणले. त्यानंतर त्याचा प्रवास पॅरालिम्पिकसाठी झाला. त्यानंतर जे झाले ते सर्व जगाने पाहिले. पॅरालिम्पिक असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्षांसह आझम स्पोर्ट्स अकादमीनेदेखील मोलाचे सहकार्य केल्याची कबुली सचिनने दिली. दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र पॅरालिम्पिक असोसिएशन चांगले काम करीत आहे, याचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असे आवाहनसुद्धा सचिनने केले. दिव्यांग बांधवांसाठी सरकार चांगले नियोजन करीत आहे. परंतु, कॅपेबल खेळाडूंना जेवढे मानधन मिळते तेवढे मानधनसुद्धा पॅरा खेळाडूंना मिळावे अशी अपेक्षादेखील त्याने व्यक्त केली.

Web Title: Being proud of maharashtra decided to play from here paralympian silver medalist sachin khilari got an offer from haryana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 09:35 PM

Topics:  

  • Paris Paralympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.