Miracle in the world of sports! Ben Foakes' 'magical' catch left even the players on the field speechless; Watch VIDEO
Yorkshire v Surrey : यॉर्कशायर विरुद्ध सरेच्या सामन्यात एक अद्भुत असा प्रकार घडला आहे. या सामन्यात सद्या इंग्लंड क्रिकेट संघाबाहेर असलेला अनुभवी यष्टिरक्षक बेन फोक्सने काउंटी डीआयव्ही१ च्या २८ व्या सामन्यामध्ये अफलातून झेल टिपला आहे. त्याचा झेल बघून मैदानातील खेळाडू देखील अवाक होऊन केवळ बघत राहिले. या झेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की सरेचा टॉम लॉजच्या डावाच्या ३३ व्या षटकात यॉर्कशायरचा फलंदाज जोनाथन टॅटरसॉलने लेग साईडवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू आणि बॅटमध्ये योग्य संबंध न आल्याने चेंडू शॉर्ट फाइन लेगकडे गेला. जिथे फॉक्सने विकेटच्या मागून लांब पळत जात डायव्हिंग करून झेल टिपला. हा झेल खूपच अफलातून असा होता. परिणामी टॅटरसॉलला माघारी परतावे लागले.
यॉर्कशायरचा फलंदाज जोनाथन टॅटरसॉलने एकूण ३८ चेंडूंचा सामना करत त्याने २१.०५ च्या स्ट्राईक रेटने फक्त आठ धावा केल्या. जेव्हा तो माघारी परतला तेव्हा ३३ षटकांच्या खेळानंतर यॉर्कशायरचा स्कोअर तीन गडी गमावून ८७ धावा इतका झाला होता.
WHAT A CATCH FROM BEN FOAKES. 🤯pic.twitter.com/EecGNHGRKH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 17, 2025
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, लंडनमध्ये झालेल्या सामन्यात यॉर्कशायरच्या संघाने नाणेफेक गमावली होती. त्यांनी प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ८०.४ षटकांत २५५ धावांवर सर्वबाद झाले. यॉर्कशायरसाठी पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज पाचव्या क्रमांकाचा फलंदाज जॉनी बेअरस्टो होता. ज्याने ११४ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ८९ धावा केल्या. या दरम्यान त्याने १३ चौकार लगावले.
हेही वाचा : IND Vs END : इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कर्णधार ठरेना! Ravi Shastri कडून ‘या’ खेळाडूच्या नावाला पसंती…
प्रत्युत्तरात विरोधी संघाने दिलेल्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सरे संघाने खेळ थांबेपर्यंत १३ षटकांत कोणताही गडी न गमावता ४९ धावा केल्या आहेत. कर्णधार रोरी बर्न्स ५३ चेंडूत २७ धावांवर नाबाद राहील आहे, तर डोमिनिक सिब्ली २७ चेंडूत १० धावांवर खेळत आहे.
बीसीसीआयकडून एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेले आयपीएल २०२५ आजपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या हंगामातील ५८ वा सामना १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. पुन्हा एकदा चाहत्यांना क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आजपासून पुन्हा खेळवले जाणार आहे.