रवी शास्त्री(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs END : इंग्लंड दौरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, अद्यापही टीम इंडियाच्या नवीन कसोटी कर्णधाराचे नाव समोर आलेले नाही. या नावावरून पडदा लवकरच उठणार असल्याचे बोलले जात आहे. तथापि, क्रिकेट दिग्गज अजूनही त्यांचची वेगवेगळी मतं मांडताना दिसत आहेत. या मतांच्या यादीत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील उडी घेतली आहे. शास्त्री म्हणाले की, जसप्रीत बुमराहला टीम इंडियाची धुरा संभाळायला अजिबात देऊ नये.
माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी त्यामागील कारण देखील स्पष्ट केले आहे. त्यांनी कर्णधारपदासाठी खरा दावेदार म्हणून शुभमन गिलचे नाव पुढे केले आहे. तर या वेळी त्यांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूचे नाव म्हणजेच ऋषभ पंतचे नाव देखील घेतले आहे. माजी प्रशिक्षकांनी असा विश्वास दाखवला आहे की, या दोन्ही खेळाडूंकडे शिकण्यासाठी भरपूर असा वेळ आहे.
हेही वाचा : RCB vs KKR : बंगळुरू आणि कोलकाता यांच्यात आज रंगणार थरार! सामन्याविषयी जाणून घ्या A टू Z माहिती..
रवी शास्त्री म्हणाले की, जर तुम्ही जसप्रीत बुमराहला कसोटी कर्णधार बनवले तर तुम्हाला त्याला गोलंदाज म्हणून गमवावे लागेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहने संघाचे नेतृत्व केले पण त्याला दुखापत झाली आणि या दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेपासून त्याला लांब राहावे लागले.
आयसीसीशी बोलत असताना रवी शास्त्री म्हणाले की, “माझ्या मते, ऑस्ट्रेलियानंतर जसप्रीत हा सर्वोत्तम पर्याय राहिला असता. पण जसप्रीतला कर्णधार बनवावे आणि नंतर तुम्ही त्याला गोलंदाज म्हणून गमावावे असे मला वाटत नाही. मला वाटते की त्याने एका वेळी एका सामन्यासाठी त्याचे शरीर तयार करायला हवे. तो आता गंभीर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे.”
रवी शास्त्री पुढे म्हणाले, आयपीएल क्रिकेट खेळतात जे चार षटकांचे क्रिकेट असते. आता १० षटके आणि १५ षटके गोलंदाजीची चाचणी असणार आहे. म्हणून तुम्हाला शेवटची गोष्ट अशी हवी आहे की कर्णधार म्हणून त्याच्या मनावर कोणताही दबाव येता कामा नये.
गिलबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले की, “तुम्ही एखाद्याला तयार करता आणि मी म्हणेन की शुभमन सद्या खूप चांगला दिसत आहे. त्याला एक संधी द्या. तो २५, २६ वर्षांचा आहे, त्यालाही वेळ द्यावा लागेल.” मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांनी शुभमन गिलशी चर्चा केली आहे. तो पुढील कसोटी कर्णधार असेल अशी माहिती समोर येत आहे.
रवी शास्त्री यांनी शुभमन गिलसह ऋषभ पंतलाही आपली पसंती दर्शवली आहे. शास्त्री म्हणाले, “ऋषभ देखील आहे. मला वाटतं ते दोघेही तरुण खेळाडू असून त्यांच्यापुढे एक दशक आहे. म्हणून, त्यांना शिकू द्या. आता त्यांच्याकडे कर्णधार म्हणून अनुभव जमा आहे, त्यांच्या फ्रँचायझींचे नेतृत्व केल्याने फरक पडत आहे.”