आरसीबी विरुद्ध गुजरात : आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आजच्या सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२४ च्या (IPL 2024) या सीझनमध्ये खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्यांनी आतापर्यत फक्त ३ सामने जिंकले आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या या गुणतालिकेत बंगळुरू तळाला दहाव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा संघ ८ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात आरसीबीने बलाढ्य गुजरातवर आघाडी घेतली होती. विल जॅकने धडाकेबाज फलंदाजी करताना शतक झळकावले, तर विराट कोहलीही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. चिन्नास्वामीच्या मैदानावर शुभमन गिलला आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल.
जाणून घ्या हवामानाचा अंदाज
चिन्नास्वामी यांच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स ( RCB vs GT ) यांच्यातील रोमांचक सामना खेळवला जाईल. सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे. हवामान पूर्णपणे स्वच्छ राहील. बेंगळुरूमध्ये संध्याकाळी तापमान 27 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. म्हणजे खेळाडूंना अतिउष्णतेचा सामना करावा लागणार नाही. चिन्नास्वामीचे मैदान हे फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते. छोट्या चौकारामुळे या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असते आणि चेंडू पटकन बॅटकडे येतो. मात्र, फिरकी गोलंदाजांनाही खेळपट्टीची थोडीफार मदत मिळते.
कुणाचं पारडं जड?
चिन्नास्वामी यांच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 88 आयपीएल सामने झाले आहेत. यापैकी 37 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 47 सामन्यांत मैदानावर मजल मारली आहे. म्हणजे या मैदानावर पाठलाग करणे अधिक फायदेशीर आहे.