मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव (फोटो -सोशल मिडिया)
एमआयचा आरसीबीविरुद्ध 18 रन्सने पराभव
कर्णधार हार्दिक पंड्याने संघाला दिला धीर
मुंबईचा सलग तिसरा पराभव
Tata IPL 2026 MI vs RCB Result: काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. कालच्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा 18 रन्सने पराभव केला. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. सुरुवात चांगली झाली असली तरी त्यानंतर संघाची कामगिरी अत्यंत सुमार राहिलेली आहे. आता यावर कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या संघातील खेळाडूना धीर दिला आहे.
मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया पोस्टवर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकतर आपण जिंकू शकतो किंवा पराभव झाल्यास त्यातून काहीतरी शिकू शकतो.
हार्दिक पंड्याने व्हिडिओत काय म्हटले?
महेला जयवर्धने म्हणाले त्यानुसार, ते बघून मला असं वाटतं की आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे, आपण सर्वांनी आपल्या खोलीत जावं आणि नेमकी चूक कुठे झाली याचा विचार करावा. मला माहित आहे की हे कठीण आहे. पराभव नेहमीच त्रासदायक असतो. पण आपल्याला आपल्या चुकांमधून शिकावे लागेल. एकतर आपण मॅच जिंकतो किंवा त्यातून काहीतरी शिकतो. पराभूत होणं हा कधीच पर्याय नसतो.
"𝘓𝘦𝘵'𝘴 𝘭𝘦𝘢𝘳𝘯 𝘧𝘳𝘰𝘮 𝘰𝘶𝘳 𝘮𝘪𝘴𝘵𝘢𝘬𝘦𝘴" – Captain HP's message to the team! 💙 pic.twitter.com/UAJ36N0ceq — Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2026
कालच्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 240 रन्स करून मुंबईच्या संघाला 241 रन्सचे टार्गेट दिले. ते आव्हान मुंबई इंडियन्स गाठू शकले नाही. 18 रन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. हार्दिक पंड्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.
Ro-Hit Man ‘ऑन फायर’; Mumbai Indians साठी केला ‘हा’ ‘विराट’ विक्रम, व्हाल थक्क
Ro-Hit Man ‘ऑन फायर’
मुंबई इंडियन्सकडून खेळताना भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यान मुंबईकडून खेळताना 6 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी 6 हजार रन्स करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. एखाद्या संघासाठी सर्वाधिक रन्स करण्याच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्याने आरसीबीसाठी 8 हजार पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत.






