After the Bengaluru stampede, wisdom came to light! The country's second largest stadium will be in Karnataka; Chief Minister's big announcement
India’s second largest cricket stadium to be built in Bengaluru: बेंगळुरू चेंगराचेंगरीने संपूर्ण देश हादरून गेला होता. पहिल्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकणारा आरसीबी संघ ४ जून रोजी आनंद साजरा केला होता. त्यावेळी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आणि त्यामध्ये अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते. तेव्हा हा मुद्दा प्रचंड गाजला होता. आता अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी कर्नाटक गृहनिर्माण मंडळाच्या बोम्मासंद्र येथील सूर्या सिटी येथे जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमच्या प्रस्तावाला मजुरी दिली आहे. ज्यामध्ये ८०,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता असणारा आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी १६५० कोटी रुपये खर्च येणार आहे. कर्नाटकात उभारले जाणारे हे स्टेडियम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर देशातील दुसरे सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे.
क्रिकेट आणि इतर क्रीडा सुविधांनी सुसज्ज असणारे स्टेडियम हे १०० एकर जमिनीवर बांधले जाणार आहे. कर्नाटक गृहनिर्माण मंडळ या १,६५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च उचलणार असून यामध्ये केवळ एक क्रिकेट मैदानच नाही तर आठ इनडोअर आणि आठ आउटडोअर खेळांसाठी सुविधा, एक आधुनिक जिम, एक प्रशिक्षण केंद्र, एक स्विमिंग पूल, एक गेस्ट हाऊस, एक हॉस्टेल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी एक कन्व्हेन्शन हॉल देखील असणार आहे. हे स्टेडियम बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) सारखे असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाचे तपास करणारे न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा चौकशी आयोगाकडून म्हटले गेले आहे की, केवळ १७ एकर जागेवर पसरलेले ३२,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या स्पर्धांसाठी सक्षम नाही. आयोगाकडून शिफारस करण्यात आली आहे की, असे सामने अधिक जागा, चांगल्या सुविधा आणि पार्किंग असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात यावे.
११ ऑगस्टपासून सुरवात होणाऱ्या देशांतर्गत टी२० लीग महाराजा ट्रॉफीला म्हैसूरला स्थलांतरित करण्यात आले आहे. पोलिसांच्या परवानगीअभावी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला म्हैसूरमध्ये महाराजा ट्रॉफीचे आयोजन करावे लागले आहे. त्यानंतर २०२६ मध्ये महिला विश्वचषक आणि आयपीएल सामने आयोजित करण्याबाबत देखील प्रश्न निर्माण होऊ लागले.
जून महिन्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल विजयाच्या आनंद साजरा करतेवेळी स्टेडियमभोवती जमलेल्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी घडून आली. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या अपघातात ११ जणांचा नाहक बळी गेला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले होते.