Shaheen Afridi sets a record : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळून झाला असून पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ ४९ षटकांत २८० धावांवर सर्वबाद झाला होता. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने ४८.५ षटकांत पाच विकेट्स गमावून विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तान गोलदांज शाहीन शाह आफ्रिदीने ४ विकेट्स घेत ही मोठी कामगिरी केली आहे. यासह त्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा विक्रम मोडीत काढला आहे.
शाहीन आफ्रिदीने मोहम्मद शमीला मागे टाकले आहे. शाहीन आफ्रिदी आता कसोटी राष्ट्रात सर्वोत्तम बॉलिंग स्ट्राइक रेटसह १०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात ५१ धावा देऊन ४ बळी टिपले आहे.
विस्डेनच्या मते, शाहीनचा बॉलिंग स्ट्राइक रेट आता २५.४ असा आहे. त्याच वेळी, शमीचा बॉलिंग स्ट्राइक रेट २५.८ पेक्षा जास्त राहिला आहे. शाहीन सध्या एकमेव गोलंदाज आहे, ज्याची सरासरी सध्या प्रति मॅच दोनपेक्षा जास्त असून शाहीनचे आकडे आश्चर्यकारक असे आहेत. त्याने ६५ वनडे सामन्यांमध्ये एकूण १३१ विकेट्स घेण्याची किमया केली आहे. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला ६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये शाहीनपेक्षा जास्त बळी घेण्यात यश आलेले नाही.
यापूर्वी ही सर्वोत्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क आणि अफगाणिस्तानच्या रशीद खान यांच्या खात्यावर जमा होती, ज्यांनी १२९-१२९ बळी घेतले आहेत. त्याच्या सध्याच्या विक्रमासह, शाहीन ६६ सामन्यांनंतर देखील हा विक्रम कायम ठेवणार आहे. दुसरीकडे, स्टार्कला मागे टाकण्यासाठी, त्याला ६७ सामन्यांपूर्वी १३३ बळी घेण्याचा विक्रम मोडावा लागेल. जर शाहीन पुढच्याच सामन्यात असे करण्यात यश मिळवले तर तो ६७ एकदिवसीय सामन्यांपूर्वी सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू बनणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्यात आली. भारतीय संघाने युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली. यामध्ये शुभमन गिलने तर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला. त्याने या मालिकेत १० डावांमध्ये ७५४ धावा केल्या. अशातच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी रेड फॉर रुथ चॅरिटीला दिली आहे. त्यानंतर या जर्सीचा सुमारे ५.४१ लाख रुपयांना लिलाव करण्यात आला. या दरम्यान, दोन्ही संघांच्या अनेक खेळाडूंच्या शर्ट, कॅप्स आणि इतर गोष्टींचा देखील लिलाव करण्यात आला.