Sending photos of private parts, forcibly kissing...; Coach banned for 9 months for shameful behavior with female employees..
County Coach Banned for 9 Months : लंडनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका काउंटी क्रिकेट प्रशिक्षकावर ९ महिन्यांची क्रिकेटमधून बंदी घातली गेली आहे. दोन ज्युनियर महिला कर्मचाऱ्यांसोबत वाईट वर्तन आणि अश्लील फोटो पाठवल्याबद्दल काउंटी क्रिकेट प्रशिक्षकावर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
महिला कर्मचाऱ्यांसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्या प्रशिक्षकाला ठोठावण्यात आलेल्या ९ महिन्यांच्या बंदीच्या शिक्षेपैकी ३ महिन्यांची शिक्षा सध्या निलंबित राहील. जर भविष्यात प्रशिक्षकाने कोणती देखील चूक केली नाही तर हे ३ महिने माफ करण्यात येऊ शकतात. म्हणजेच, जर तो ठीक राहिला तर त्याला फक्त ६ महिनेच शिक्षा भोगावी लागणार आहे. अश्लील संदेश पाठवल्याबद्दल आणि ज्युनियर स्टाफला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रशिक्षकाला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हेही वाचा : शुभमन गिलला सोन्याचे दिवस! ICC Player of the Month साठी नामांकन; ‘या’ खेळाडूंशी करावे लागतील दोन हात..
क्रिकेट देखरेख संस्थेकडून बुधवारी ही शिक्षा देण्यात आली आहे. जी स्वतंत्र शिस्तपालन पॅनेल (क्रिकेट शिस्तपालन पॅनेल – सीडीपी) च्या निर्णयानंतर घेण्यात आली आहे. अपवादात्मक आरोग्य परिस्थितीमुळे प्रशिक्षकाचे नाव सार्वजनिक करण्यात आलेले नाही.
निकालानुसार, या घटना २०२३ च्या उन्हाळ्यापासून २०२४ च्या सुरुवातीपर्यंतच्या कालावधीत घडल्या आहेत. प्रशिक्षकाने क्लबच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना अनेक वेळा अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवली आहेत, ज्यात त्याच्या गुप्तांगांचे फोटोंचा देखील समावेश आहे. इतकेच नाही तर त्याने एका कर्मचाऱ्याला चेंजिंग रूममध्ये बोलवून जबरदस्तीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
एका पीडितेकडून सांगण्यात आले की, तिने अश्लील छायाचित्रांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, तरी देखील प्रशिक्षकाकडून तिला आणखी दोन छायाचित्रे पाठवण्यात आली होती. दुसऱ्या घटनेत, प्रशिक्षकाने कचरा पाहण्याच्या बहाण्याने पीडितेला चेंजिंग रूममध्ये बोलवून घेतले आणि तिला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ती मागे हटली होती.
निर्णयात प्रशिक्षकाच्या या लज्जास्पद वर्तनाचा तीव्र निषेध करण्यात आला. पॅनेलने म्हटले आहे की, “प्रशिक्षकाचे वय आणि त्याचे उच्च स्थान पाहता, परिस्थितीमध्ये त्याची बाजू स्पष्टपणे वरचढ होती. त्याने कबूल केलेल्या गैरवर्तनाचे आधुनिक समाजात किंवा क्रिकेट वातावरणात कोणतीही जागा नाही. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण मिळायला हवे.”
या घटनेनंतर, प्रशिक्षकाला काउंटी क्रिकेट क्लबमधून काढून टाकण्यात आले आहे. तेव्हापासून त्याने पुन्हा क्रिकेटमध्ये कधी काम केलेले नाही. त्याला सध्या प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनकडून मानसिक आरोग्यासाठी मदत देण्यात येत आहे.