Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर, मनप्रीत सिंगकडे कर्णधार पदाची धुरा

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games 2022) भारताने आज १८ सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची (Indian Hockey Team) घोषणा केली आहे. या संघासाठी मनप्रीत सिंगची (Manpreet Singh) कर्णधारपदी तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 20, 2022 | 07:06 PM
indian hockey team for commonwelath games

indian hockey team for commonwelath games

Follow Us
Follow Us:

येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सचं (Commonwealth Games 2022) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये साधारण ७२ देशांतील पाच हजार ५४ खेळाडू सहभागी होतील ,असा अंदाज आहे. या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने आज १८ सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची (Indian Hockey Team) घोषणा केली आहे. या संघासाठी मनप्रीत सिंगची (Manpreet Singh) कर्णधारपदी तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

[read_also content=”राज्यात दिवसभरात २३५४ नव्या रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-corona-update-2354-new-patients-registered-in-state-nrsr-294944.html”]

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय संघाला इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना सोबत पूल ‘ब’मध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ ३१ जुलै रोजी घानाविरुद्ध खेळेल. गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कास्यपदक जिंकून भारतीय संघाचे नेतृत्व करणारा मनप्रीत याही स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल.

अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. बचावाची जबाबदारी वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग आणि जरमनप्रीत सिंग यांच्यावर असेल. मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, आकाशदीप सिंग आणि नीलकांत शर्मा यांना मिडफिल्डमध्ये स्थान मिळाले आहे. मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, गुरजंत सिंग आणि अभिषेक यांचा स्ट्रायकर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

हँगझोऊ आशियाई खेळांमध्ये आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कमी कालावधी असल्यामुळे हॉकी इंडियाने सुरुवातीला राष्ट्रकुल खेळांसाठी द्वितीय श्रेणीचा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चीनमधील कोविड-१९च्या परिस्थितीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने एक मजबूत संघ निवडला.

Web Title: Commonwealth games 2022 indian men hockey team announcement nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2022 | 07:05 PM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • manpreet singh

संबंधित बातम्या

Asian Champions Trophy : मिडफिल्डर मनप्रीत संपूर्ण स्पर्धेतून बाहेर, विवेक सागरचा संघात समावेश
1

Asian Champions Trophy : मिडफिल्डर मनप्रीत संपूर्ण स्पर्धेतून बाहेर, विवेक सागरचा संघात समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.