CPL 2025: Fletcher's explosive innings in vain! Search somewhat ruined by McDermott's storm; Guyana's explosive victory
CPL 2025 :सद्या कॅरिबियन प्रीमियर लीगचा थरार बघायला मिळत आहे. या स्पर्धेत अनेक रंजक क्षण अनुभवायला मिळत आहे. असाच प्रकार गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स यांच्यात दुसऱ्या सामन्यात घडला आहे. या सामन्यात गयाना अमेझॉन वॉरियर्सने सेंट किट्स संघाचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. गयानासमोर सेंट किट्सने विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, गयानाने ५ विकेट्स गमावून हे लक्ष्य १७.२ षटकांत पूर्ण केले. सामन्यापूर्वी गयानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना, सेंट किट्स संघाने ८ विकेट्स गमावून २० षटकांत १५३ धावा केल्या होत्या. सेंट किट्सकडून यष्टीरक्षक आणि सलामीवीर आंद्रे फ्लेचरने स्फोटक खेळी करून ४१ चेंडूत ६० धावां केल्या, परंतु त्याची खेळी व्यर्थ गेली आणि त्याच्या संघाचा पराभव झाला.
हेही वाचा : ‘आफ्रिदीने कुत्र्याचे मांस खाल्ले म्हणून भुंकतोय..’, पाकिस्तानी खेळाडूबद्दल इरफान पठाणचा सनसनाटी खुलासा
गयानाकडून प्रिटोरियसने ४ षटकांत ४३ धावा मोजत ३ बळी घेतले. शमार जोसेफ किफायतशीर ठरला. त्याने ४ षटकांत २५ धावा देत १ विकेट मिळवली. रोमारियो शेफर्डने ३ षटकांत १७ धावा देत १ बळी टिपला. कर्णधार इम्रान ताहिरने ४ षटकांत २९ धावा देत २ बळी टिपले .
सेंट किट्सने दिलेल्या १५४ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गयाना अमेझॉन वॉरियर्सकडून सलामीवीर बेन मॅकडर्मॉटने वादळी खेळी केली. त्याने ३९ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह ७५ धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे संघाचा विजय सुकर झाला. यानंतर, शाई होपने देखील ३९ चेंडूंत ५६ धावांची नाबाद महत्वपूर्ण खेळी केली. या दोघांच्या खेळीने गयानाने १७.२ षटकांत १५४ धावा सहज पार करून संघाला विजय मिळवून दिला. गयानाने ५ विकेट गमावत १५४ धावा केल्या आणि सामना ५ विकेटने आपल्या खिशात टाकला. सेंट किट्सकडून फजलहक फारुकी, नसीम शाह आणि वकार सलामखिल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर अब्बास आफ्रिदीने २ गडी माघारी पाठवले.
हेही वाचा : Asia cup 2025 : T20 सामन्यांमध्ये कुणाची दहशत? शुभमन गिल की संजू सॅमसन? जाणून घ्या २१ सामन्यांचा लेखाजोखा