संजू सॅमसन आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली.आता भारतीय संघ आशिया कप २०२५ च्या तयारीला लागला आहे. आशिया कप २०२५ च्या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार असून ही स्पर्धा २८ सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. या वेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्या आधीच भारतीय संघातील नेमकी कुणाला संधी मिळेल अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांच्यात खरी स्पर्धा दिसून येत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये या दोन खेळाडूंनी आपली चांगलीच छाप पाडली आहे. या दोघांच्या सुमारे २१ टी-२० सामन्यांनंतर दोघांच्याही आकडेवारीबद्दल जाणून घेऊया.
हेही वाचा : पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान
आशिया कपमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासोबत टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करतां दिसण्याची शक्यता आहे. अशी चर्चा रंगताना दिसून येत आहे. अलिकडेच इंग्लंड मालिकेदरम्यान शुभमन गिलने सर्वाधिक धाव केलया आहेत. इंग्लंड दौऱ्या दरम्यान बॅट आणि नेतृत्वाने गिलने सर्वांना प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआय त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. आशिया कप २०२५ मध्ये त्याला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांच्यात थेट स्पर्धा बघायला मिळत आहे. शुभमन गिल प्रत्येक फॉरमॅटमध्ये ओपनिंग करायला आवडत असून विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो आतापर्यंत डावाची सुरुवात करताना दिसून आला आहे. अशा परिस्थितीत, जर त्याला आशिया कप २०२५ मध्ये अंतिम ११ मध्ये जागा देण्यात आली तर त्याची थेट स्पर्धा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसोबत होणार आहे.
जर आपण २१ टी-२० सामन्यांनंतर संजू सॅमसनच्या सरासरीबद्दल माहिती घेतली तर ती १८.८२ इतकी राहिली आहे. या दरम्यान, त्याने ३२० धावा केल्याया असून दुसरीकडे, २१ टी-२० सामन्यांनंतर शुभमन गिलची सरासरी ३०.४२ इतकी आहे. या दरम्यान, त्याने एकूण ५७८ धावा फटकावल्या आहेत. यानुसार, शुभमन गिल दोन्ही सरासरीमध्ये संजू सॅमसनपेक्षा वरचढ असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : ‘आफ्रिदीने कुत्र्याचे मांस खाल्ले म्हणून भुंकतोय..’, पाकिस्तानी खेळाडूबद्दल इरफान पठाणचा सनसनाटी खुलासा
२१ टी-२० सामन्यांनंतर गिलचा स्ट्राइक रेट १३९.२७ इतका आहे. या दरम्यान त्याने न्यूझीलंडविरुद्ध तीन डावात १८४, श्रीलंकेविरुद्ध पाच डावात १३५.०५, वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट १२० आणि झिम्बाब्वेविरुद्ध १२५.९२ स्ट्राइक रेट होता. तसेच २१ टी-२० सामन्यांनंतर संजू सॅमसनचा स्ट्राईक रेट १३१.१४ इतका राहिला होता. या काळात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४१.१७, श्रीलंकेविरुद्ध १२५.९२, वेस्ट इंडिजविरुद्ध १२०.७५ आणि आयर्लंडविरुद्ध १८३.३३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या बाबतीतही शुभमन गिलने बाजी मारली आहे.