डॅव्हिड वॉर्नरच्या अडचणीत वाढ! (Photo Credit- X)
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी सिडनीमध्ये डॅव्हिड वॉर्नरला ड्रिंक-ड्रायव्हिंग करताना पकडण्यात आले. ‘ईस्टर संडे’च्या दिवशी ही कारवाई करण्यात आली असून, वॉर्नरच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी 0.104 आढळली, जी कायदेशीर मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त आहे. याप्रकरणी 39 वर्षीय वॉर्नरला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. आता त्याला 7 मे रोजी डाउनिंग सेंटर लोकल कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
David Warner was arrested in Sydney on Sunday on a charge of drink driving after failing a breathalyser test. AAP reported that Warner was over twice the legal limit to be able to drive when he was stopped for a random test by police. pic.twitter.com/E696Z6HRSQ — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 7, 2026
क्रिकेटविश्वाला हादरवणारी बातमी! Australia च्या David Warner ला पाकिस्तानात अटक; प्रकरण काय?
या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषतः ‘क्रिकेट NSW’ (New South Wales) या संस्थेसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे, कारण ही संस्था रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी ओळखली जाते. अशा परिस्थितीत, आपल्या ब्रँड व्हॅल्यूचे रक्षण करण्यासाठी सिडनी थंडर वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार करत आहे.
क्रिकेट NSW चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ली जर्मन यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर अधिक भाष्य करू शकत नाही. मात्र, मद्यपान करून गाडी चालवण्याचे आरोप अत्यंत गंभीर असून आम्ही याकडे गांभीर्याने पाहत आहोत. क्रिकेट NSW नेहमीच सुरक्षित ड्रायव्हिंगचे समर्थन करते.” जर्मन यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, सध्या कर्णधारपदाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, मात्र कायदेशीर प्रक्रियेनंतर योग्य ते पाऊल उचलले जाईल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला डॅव्हिड वॉर्नर सध्या ‘पाकिस्तान सुपर लीग’मध्ये (PSL) कराची किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. पाठीच्या त्रासामुळे तो हैदराबाद किंग्समेन विरुद्धच्या गेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता, मात्र 16 एप्रिल रोजी इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. बिग बॅश लीगमध्ये वॉर्नरने 86.6 च्या सरासरीने धावा कुटत आपला फॉर्म सिद्ध केला होता, मात्र मैदानाबाहेरील या वादामुळे त्याच्या प्रतिमेला मोठा तडा बसला आहे. आता कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष लागले आहे.






