डेव्हिड वॉर्नरला अटक (फोटो -ians)
क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक
पीएसएल स्पर्धेत कराची संघाचे नेतृत्व
दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई
David Warner Arrest: सध्या भारतात आयपीएलची धूम सुरू आहे. आयपीएल सुरू होऊन जवळपास किमान एक आठवडा झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये देखील पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सूपर लीग सुरू आहे. पाकिस्तान सुपर लीगमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पाकिस्तान सुपर लीग काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत आहेत. त्यामध्ये काही वादग्रस्त घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. त्यातच आता डेव्हिड वॉर्नरला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. डेव्हिड वॉर्नर पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज संघाचा कर्णधार आहे. दरम्यान दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर कराची किंग्ज संघाचे नेतृत्व करत असल्याचे समोर आले आहे. डेव्हिड वॉर्नर आता मैदानाबाहेर वादात सापडला आहे. दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्जचे नेतृत्व करणार की नाही तसेच तो ही स्पर्धा खेळू शकणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलले आहे.
बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेट पुन्हा हादरले
पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये कराची किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान लाहोर कलंदर्स वादात सापडले. चेंडू छेडछाड केल्याबद्दल त्यांच्यावर दंड आकारण्यात आला. अंतिम षटकाच्या अगदी आधी पंचांनी कराचीला पाच पेनल्टी धावा दिल्या. हा एक असा क्षण होता ज्याचा सामन्याच्या निकालावर खोलवर परिणाम झाला आणि अखेरीस कराचीने तीन चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.
ही घटना केव्हा घडली?
ही घटना सामन्याच्या दुसऱ्या डावातील १९ व्या षटकाच्या अखेरीस घडली, जेव्हा कराचीला विजयासाठी १४ धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज हरिस रौफ लाहोरसाठी शेवटचे षटक टाकणार होता. मात्र, षटक सुरू होण्यापूर्वीच, कर्णधार शाहीन आफ्रिदी, रौफ आणि फखर जमान हे गोलंदाजाच्या रन-अपजवळ जमून चेंडू हातात घेताना दिसले.मैदानातील पंच फैसल आफ्रिदी यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आणि चेंडू तपासण्याचा निर्णय घेतला. स्क्वेअर-लेग पंच शरफुद-उद-दौला यांच्याशी सखोल तपासणी आणि चर्चा केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला की चेंडूची स्थिती जाणूनबुजून बदलण्यात आली होती.






