ऑस्ट्रेलिया वि भारत(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS Adelaide Run Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS)यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मलिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दूसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये खेळवण्यात येणार आहे. अॅडलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने केवळ सर्वोच्चच नाही तर सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्या नोंदवली आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.
२६ जानेवारी २०१७ रोजी, अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट गमावून ३६९ धावा उभ्या केल्या होत्या. या मैदानावरील ही सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या ठरली आहे.
हेही वाचा : फुटबॉलप्रेमींच्या पदरी निराशा! क्रिस्टियानो रोनाल्डो भारतात येणार नाही; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
या सामन्यायाधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीकया शानदार भागीदारीने ऑस्ट्रेलियाला मजबूत सुरवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी ४१.३ षटकांत २८४ धावांची मोठी भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नरने १२८ चेंडूत १७९ धावा करून माघारी परतला. त्याने डावात ५ षटकार आणि १९ चौकार मारले.
डेव्हिड वॉर्नर बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडू लागल्या होत्या. तथापि, फलंदाजांनी वेगाने धावा काढत राहिल्या. ट्रॅव्हिस हेडने १३७ चेंडूत १२८ धावा फटकावल्या होत्या. या खेळीत त्याने तीन षटकार आणि नऊ चौकार लगावले होते. जुनैद खान आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
डोंगरा एवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४९.१ षटकात ३१२ धावांवरच गारद झाला. पाकिस्तानकडून बाबर आझमने १०० तर शर्जील खानने ७९ धावा फटकावल्या होत्या. परिणामी ऑस्ट्रेलियाने ५७ धावांनी सामना खिशात टाकला. अॅडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाने सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम देखील नोंदवला.
हेही वाचा : BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची ‘अकड’ कायम; ट्रॉफी परत देण्यासाठी ठेवली नवी अट!
२७ जानेवारी १९८६ रोजी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेऊन सात बाद २७६ धावा उभ्या केल्या होत्या. या डावात ब्रूस एडगर आणि जॉन राईट यांनी प्रत्येकी ६१ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलिया २६.३ षटकात फक्त ७० धावांवरच गदगडला. डेव्हिड बून (१०) आणि वेन फिलिप्स (२२) वगळता, इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मैदानावर टिकता आले नाही. न्यूझीलंडने हा सामना २०६ धावांनी आपल्या नावावर केला.