DC vs KKR: DC and KKR will clash today, know with the pitch report who will maintain dominance?
DC vs KKR : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४७ सामने खेळवण्यात आले आहेत. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स सामना रोमांचक झाला. आजही असाच सामना होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात दिल्ली संघ कोलकात्याशी भिडणार आहे.या हंगामात दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करताना दिसत आहे. दिल्लीने आतापर्यंत ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत. गेल्या सामन्यात मात्र दिल्लीला आरसीबीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत, आता त्यांना कोलकात्याला हरवून गुणतालिकेत सुधारणा करणे गरजेचे आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत ९ पैकी केवळ ३ सामन्यातच विजय मिळवला आहे. ते पॉइंट्स टेबलमध्ये खूपच खालीय आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, केकेआर हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा : RR vs GT : एक सूर्यवंशी तर दुसरीकडे जयस्वाल! गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना पाजलं पाणी, RR ने 8 विकेट्सने मिळवला विजय
पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा शेवटचा सामना होता, परंतु तो पावसामुळे रद्द झाला. आता आज केकेआरचा सामना दिल्ली संघाशी होणार आहे. आजचा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत, आज हवामान कसे असेल आणि खेळपट्टीची स्थिती काय असेल याबाबत जाणून घेऊया.
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. वेगवान आउटफिल्ड आणि लहान चौकारांमुळे, येथील फलंदाजांना भरपूर चौकार आणि षटकार मारण्याची संधी मिळते. दिल्लीची खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत करताना दिसत नाही.
खेळपट्टीच्या अहवालानुसार, या खेळपट्टीवरून फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर, या मैदानावर एकूण ९२ आयपीएल सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४४ सामने जिंकले आहेत असून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ४७ सामने जिंकले आहेत. तर १ सामना बरोबरीत सुटला आहे. अशा परिस्थितीत, दिल्ली आणि केकेआर यांच्यातील आजच्या सामन्यात जो कोणी नाणेफेक जिंकेल तो मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. येथील सरासरी धावसंख्या १६७ राहिली आहे. अशा परिस्थितीत हा सामना खूप रोमांचक होणार हे मात्र नकी.
केकेआर आणि डीसी यांच्यात एकूण खेळलेले ३३ सामने खेळवण्यात आले आहेत.
त्यामध्ये दिल्ली १५ सामने जिंकलीअ आहे तर केकेआरने १८ सामने आपल्या नावे केले आहेत.