वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मिडिया)
Vaibhav Suryavanshi Hundred IPL 2025 : काल आयपीएल २०२५ मधील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आला. हा सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यापूर्वी रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने हे लक्ष्य १६ व्या षटकातच पूर्ण केले. या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीबरोबरच यशस्वी जैस्वाल या दोघांनी तूफान फटकेबाजी करत सामना एकतर्फी जिंकला. काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सला ८ विकेटने पराभूत केले. हा सामना लक्षात राहिला तो म्हणजे १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने लगावलेल्या शतकामुळे. त्याने अवघ्या ३५ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या खेळीने सर्वांचे अलक्ष वेधून घेतले. या खेळी बाबत त्याचे बालपणीचे प्रशिक्षक म्हणाले की, ‘वैभव अशी खेळी करण्याचा इराद्यानेच मैदानात उतरला होता.’
वैभवने गुजरात विरुद्ध शतक ठोकले आहे. यात त्याने ७ चौकार आणि तब्बल ११ षटकार खेचले आहेत. त्याच्या खेळीचे सर्वच कौतुक करताना दिसत आहेत. त्याच्या खेळवर प्रतिक्रिया देताना वैभवचे प्रशिक्षक म्हणाले की, ‘वैभव अशी खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरला होता’ , असं त्याचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितलं.
ओझा म्हणाले, पुढे म्हणाले की, ‘ सोमाववारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मला वैभवचा फोन कॉल आला. आम्ही त्यावेळी फूटवर्क तसेच फलंदाजीच्या काही तंत्राबद्दल थोडा वेळ चर्चा केली. त्यानंतर वैभव मला खूप आत्मविश्वासाने म्हणाला की, ‘सर, आज में मारूंगा’, यावर मी त्याला म्हणालो की, ‘मार, मात्र लवकर बाद होऊ नकोस. शांत चित्ताने फलंदाजी करत रहा आणि यशस्वीबरोबर बोलत राहा.’
ओझा पुढे म्हणाले, ‘वैभव मला म्हणाला होता की तो मारेन, पण तो अशा पद्धतीने मारेल असं कधी वाटलं नव्हतं. हा एक मात्र वाटत होतं की हा आज काहीतरी मोठं करणार हे नक्की. परंतु, मी प्रामाणिकपणे म्हणेल की, इतकी मोठी ऐतिहासिक कामगिरी करेल असं कधी वाटलं नव्हतं. तो आता केवळ १४ वर्षांचाच आहे. मात्र देवाने त्याला अफाट प्रतिभेचा धनी बनवलं आहे. त्याच्या या प्रवासात मला छोटीशी भूमिका बजावता आली, त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे.’
हेही वाचा : 6,4,6,4,4,6… वय 14 वर्ष! वैभव सूर्यवंशीने वाजवले गुजरात टायटन्सचे बारा, 35 चेंडूत झळकवले आयपीएलचे पहिले शतक
काल गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने दमदार शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३८ चेंडूचा सामना करत १०१ धावा केल्या, त्याचे शतक हे केवळ ३५ चेंडूमध्ये आले आहे. त्यामध्ये त्याने ११ षटकार आणि ७ चौकारांची आतिषबाजी केली. राजस्थानने हा सामना १६ व्या षटकातच आपल्या नावे केला.