Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी देणार एक कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे राज्यस्तरीय स्पर्धांसाठी 1 कोटी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 16, 2025 | 05:11 PM
महाराष्ट्रातील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी देणार एक कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी देणार एक कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : गणेश वंदना, ढोलताशा पथक, ‘लेझर शो’, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा अतिशय दिमाखदार, जोशपूर्ण व क्रीडामय वातावरणात २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राज्यशासनातर्फे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाकरीता राज्य शासनाकडून ७५ लाख रुपयाचा निधी देण्यात येतो; खेळाडूंना चांगल्यापद्धतीने खेळ खेळता यावा, खेळाडूंना सर्व प्रकारच्या दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता यापुढे या स्पर्धांच्या आयोजनकरीता राज्यशासनातर्फे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

अनेक दिग्गज नेते राहणार उपस्थित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदोरे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी यावेळी आदी उपस्थित होते.

उपविजेत्या खेळाडूंना 45 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत, असे सांगून अजित पवार म्हणाले, कुठलाही खेळ हा महत्वाचा आहे, कोणताही खेळ हा खिळाडूवृत्तीने खेळला गेला पाहिजे प्रत्येकाच्या अंगात खिळाडूवृत्ती असली पाहिजे. यावर्षीच्या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध खेळाडू सहभागी झाले आहेत, या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना 45 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे, चांगल्या खेळाडूंचा सहभाग, भरीव आर्थिक तरतूद, बक्षिसांची मोठी रक्कम, बारामतीतील अनुकूल वातावरण, क्रीडा रसिकांचा भक्कम पाठिंबा याबळावर ही स्पर्धा यशस्वी होईल, क्रीडारसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडण्याचे काम खेळाडू करतील. देशी खेळाची लोकप्रियता वाढविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत असून, क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम राज्यशासनाच्यावतीने करण्यात येत आहे, आगामी काळात क्रीडा विभागाला अधिकचा निधी देण्यात येईल. यामुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे.

बारामतीचा चेहरा मोहरा बदलणार

वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असणारी बारामतीत छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या बारामतीत खो-खो, कबड्डी, क्रिकेट या स्पर्धासह मॅरेथॉन या सारख्या स्पर्धा होत असतात. यावर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाची संधी बारामती तालुक्याला मिळाली आहे. बारामतीचा चेहरा मोहरा बदल्याचे काम करतांना गावाचे गावपण टिकवून येथील नागरिकांचे राहणीमान अधिक उंचविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे. याकरिता बारामती सुदंर, स्मार्ट करण्याकरिता नागरिकांनी साथ दिली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: Deputy cm ajit pawars big announcement they said one crore rupees will be provided for state level competitions in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • 23rd Chhatrapati Shivaji Maharaj Cup
  • Deputy Chief Minister Ajit Pawar
  • Maharashtra State Kabaddi Association

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.