ध्रुव जुरेलचे खणखणीत शतक (फोटो- ians)
भारतीय संघ फलंदाजी करत आहे. भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. यशस्वी जयस्वालने 45 आणि केएल राहुलने 18 रन्सची खेळी केली. त्यानंतर मागील सामन्यात दीड शतकी खेळी करणाऱ्या देवदत्त पडीकलने या सामन्यात देखील शानदार 117 रन्सची आक्रमक शतकी खेळी केल्याचे पहायला मिळाले.
कर्णधार शुभमन गिलने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. तर ऋषभ पंतने देखील 63 रन्सची आक्रमक शानदार खेळी केली आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. ऋषभ पंत पाठोपाठ रवींद्र जाडेजाने देखील 43 रन्सची महत्वाची खेळी केली. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी आपली क्षमता, फॉर्म आणि क्लास सिद्ध केला आहे. मानव सुथारने 18 रन्सची खेळी केली आहे.
#TeamIndia 450 up and going strong 💪💪 Dhruv Jurel (76*) and Manav Suthar (13*) are in the middle! 👍 👍 Updates ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#SLvIND pic.twitter.com/bvhMAehWAy — BCCI (@BCCI) August 24, 2026
भारतीय संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरक्ष: धुलाई केली आहे. असिथा फर्नांडोने भारतीय संघला 4 मोठे धक्के दिले. त्याने चार विकेट्स घेतल्या. लाहिरू कुमाराने देखील महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. तसेच प्रभाथ जयसूर्या आणि केशरा नुवान्थाने प्रत्येकी एक एक विकेट पटकावली. या गोलंदाजाने सर्वाधिक 154 रन्स दिल्या.
Colombo Weather: कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता, कसे राहील तासातासाला हवामान
💯 𝙛𝙤𝙧 𝘿𝙝𝙧𝙪𝙫 𝙅𝙪𝙧𝙚𝙡! 🫡 A fantastic knock from him to bring up his second hundred in Test cricket! 🙌 🙌 Updates ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/D9fYDRpAqG — BCCI (@BCCI) August 24, 2026
भारताने टेस्ट सिरिजमध्ये पहिला सामना जिंकला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही सिरिज महत्वाची असणार आहे. पहिला सामना बहर्तणे जिंकत या सिरिजमध्ये आघाडी घेतली आहे. दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकून भारत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.






