Rishabh Pant Surpasses MS dhoni in most Runs
IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार
दुसऱ्या दिवशी सारांश जैन लवकर बाद झाल्यानंतर, पंत मैदानात परतला आणि सावधपणे फलंदाजी करत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने बॅटने एक नवीन इतिहास रचला. ऋषभ पंतने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक महत्त्वपूर्ण विक्रम मोडला आहे. पंत आता परदेशात किंवा तटस्थ मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज बनला आहे. पंतने आपल्या ३६व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली, तर धोनीला हा पराक्रम करण्यासाठी ४८ कसोटी सामने लागले. ऋषभ पंत इतिहास रचला पण तो ८९ चेंडूमध्ये ६३ धावा करुन बाद झाला. केशारा नुवांथाने ते त्याला तंबूत परत पाठवले.
ऋषभ पंतने परदेशातील/तटस्थ कसोटी सामन्यांच्या ६४ डावांमध्ये २,५०० हून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ४१ पेक्षा जास्त राहिली आहे. तर, धोनीने ४८ कसोटी सामन्यांच्या ८३ डावांमध्ये ३२.८४ पेक्षा जास्त सरासरीने २,४९६ धावा केल्या आहेत. परदेशातील सामन्यांमध्ये भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजांमध्ये फारुख इंजिनिअर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.






